भारतीय संघाचा माजी दिग्गज अष्टैपूल युवराज सिंग याने चाहत्यांसाठी स्वतःच्या घराचे दरवाजे खोलले आहेत. त्याच्या चाहत्यांना आता माजी अष्टपैलूच्या घरी पाहुणे म्हणून जाता येणार आहे. आपल्यापैकी अनेकजण रोजच्या दगदगीच्या आयुष्यातून विश्रांती घेण्यासाठी पर्यटनस्थळी भेट देत असतात. गोवा हे एक असे पर्यटनस्ठळ आहे, ज्याठिकाणी प्रत्येकाला एकदा तरी जायची इच्छा असते. पण जर तुम्हाला गोव्यातील युवारज सिंगच्या घरात राहण्याची संधी मिळाली, तर हा अनुभव कसा असेल?
युवराज सिंग (Yuvraj Singh) याचे गोव्यामध्ये एक आलिशान घर आहे. त्याने चाहत्यांना याच आलिशान घरात राहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून याविषयी माहिती दिली आहे. युवराचने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातील या घरी तो त्याच्या जवळच्या लोकांसोबत राहत असतो. आता त्याठिकाणी त्याच्या चाहत्यांना देखील राहता येऊ शकते. घरात एका वेळी 6 लोकांना राहता येईल. एका वेबसाइडवरून चाहत्यांना घर बुक करता येणार आहे. युवाराजने या वेबसाईडची लिंग देखील शेअर केली आहे.
https://www.instagram.com/p/Ciwcr1BhtZS/?utm_source=ig_web_copy_link
युवारज सिंग भारतीय संघाचासोबत अनेक वर्ष क्रिकेट खेळला आहे. त्याने टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचे देखील प्रतिनिधित्व केले आहे. माहितीनुसार गोव्यातील त्याच्या या घरी क्रिकेटशी संबंधीत अनेक आठवणी आहेत. त्याने भारतासाठी खेळलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या देखील अनेक आठवणी याठिकाणी आहेत. चाहत्यांना हे घर बुक करण्यासाठी 28 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेपासून उपलब्ध असेल. घरात एकूण 3 बेडरूम आहेत आणि एक स्विमिंग पूल देखील आहे. घरी राहायला येणाऱ्या पाहुण्यांशी युवराज वर्चुअली भेटणार आहे.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मंगळवारी (20 सप्टेंबर) खेळल्या गेलेल्या टी-20 सामना पाहण्यासाठी युवारच मैदानात उपस्थित होता. मोहालीच्या आयएस बिंद्र स्टेडियवर खेळल्या गेलेल्या या सामनासाठी युवराच उपस्थित होता आणि त्याला खास सन्मान देखील दिला गेला. युवराजने या स्टेडियवर लहानपणापासून क्रिकेटचे धडे घेतले आहेत आणि आता याच स्टेडियममध्ये एका स्टॅटला त्याचे नाव दिले गेले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
“रिषभला तुम्ही कसे बाहेर बसवू शकता?”; दिग्गजाचा संघ व्यवस्थापनाला सवाल
काय ही गोलंदाजी? एका वर्षात हर्षलची झालीये जोरदार धुलाई; वाचा संपूर्ण आकडेवारी
पुन्हा बदलले गेले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे ठिकाण! लॉर्ड्स नव्हेतर या मैदानावर होणार सामना






