भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने बीसीसीआयला भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगची 12 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याची विनंती केली आहे.
गंभीरने टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात लिहिलेल्या स्तंभलेखात म्हटले आहे की सप्टेंबर महिना खास आहे. या महिन्यात 2007 मध्ये भारताने पहिला टी20 विश्वचषक जिंकला होता. तसेच याच विश्वचषकात युवराजने 6 चेंडूत 6 षटकार मारले होते.
गंभीरने लिहिले आहे की ‘सप्टेंबर महिना माझ्यासाठी खास आहे. या महिन्यात 2007 मध्ये आम्ही टी20 विश्वचषक जिंकलो होतो. त्या स्पर्धेत युवराज चांगल्या लयीत होता.’
‘त्या स्पर्धेतील कामगिरीनंतर आणि 2011 च्या विश्वचषकातील कामगिरीनंतर बीसीसीआयला युवराज घालत असलेली 12 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याची मी विनंती करत आहे. हा त्याचा सन्मान असेल.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–सातत्याने टीकेला सामोरे जाणाऱ्या रिषभ पंतला या माजी भारतीय क्रिकेटपटूने दिला पाठिंबा
–जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या राहुल आवारेला कांस्यपदक
–द. आफ्रिका विरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया