भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने कारकिर्दीत अनेक आतीषबाजी खेळी केल्या. परंतू २००७ विश्वचषकात त्याने ज्या दोन खेळी केल्या, त्या कोणताही क्रिकेटप्रेमी सहसा विसरणार नाही.
यातील एक खेळी त्याने बरोबर १५ वर्षांपुर्वी अर्थात २२ सप्टेंबर २००७ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती. केवळ ३० चेंडूंचा सामना करताना युवराजने या सामन्यात ७० धावा केल्या होत्या.
८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गंभीर बाद झाल्यावर भारतीय संघाची अवस्था २ बाद ४१ अशी झाली होती. परंतू त्यानंतर युवराजने खेळलेली तुफानी खेळी इतकी जबरदस्त होती की त्यानंतरच्या केवळ १० षटकांत भारतीय संघाची अवस्था ४ बाद १५५ होती. यात एकट्या युवराजने ७० धावा केल्या होत्या. युवराज जेव्हा बाद झाला तेव्हा १७.३ षटकांत भारतीय संघाने ४ बाद १५५ अशी मजल मारली होती. त्यानंतर २० षटकांअखेर भारताने ५ बाद १८८ धावा केल्या होत्या.
या खेळीत त्याने ब्रेट ली, नेथन ब्रेकन, स्टुअर्ट क्लार्क, अँड्रू सायमंड, मिचेल जॉन्सन व मायकेल क्लार्कसारख्या दिग्गाजांचा सामना केला होता. युवराजने या खेळीत ५ षटकार व ५ चौकारांचा वर्षाव केला. त्यान रॉबिन उथप्पासह तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली होती. यात युवीने ५५ तर उथप्पाने २७ धावा केल्या होत्या.
१८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाला १७३ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने हा सामना १५ धावांनी जिंकत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पुढे पाकिस्तानवर शानदार विजय मिळवत भारताने पहिला व एकमेव टी२० विश्वचषक धोनीच्या नेतृत्त्वाखाली जिंकला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष- माहित नसलेला अंबाती रायडू
‘हो चिंटिंग केलेली…’, शाहिद आफ्रिदीने 17 वर्षांनंतर मान्य केली ‘ती’ चूक