नवी दिल्ली । भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने भारतीय संघ व्यवस्थापन आणि त्यांच्या निवडकर्त्यांवर पुन्हा एकदा निशाना साधला आहे. युवराजने २०१९मधील विश्वचषकात भारतीय संघाच्या निवडकर्त्यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
युवराजने (Yuvraj Singh) सोशल मीडियावरील एका लाईव्ह चॅटदरम्यान म्हटले की, २०१९ विश्वचषकात अत्यंत कमकुवत मधली फळी खेळवण्यात आली. त्यामध्ये अनुभवी खेळाडूंऐवजी रिषभ पंत (Rishabh Pant) आणि विजय शंकरसारख्या (Vijay Shankar) कमी अनुभव असणाऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात आले होते.
युवराजचा भारतीय संंघावर निशाना-
युवराज म्हणाला की, “२०१९च्या विश्वचषकात मधल्या फळीत भारतीय संंघाची (Team India) रणनीती काय होती, हे मला समजत नाही. विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) धावा काढत होते. परंतु विजय, पंत मधल्या फळीत खेळत होते. हे खेळाडू युवा होते. त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चूकीचे होते.”
“अंबाती रायडूला शेवटपर्यंत भारतीय संघातून वगळण्यात आले. तुम्ही कोणत्याही खेळाडूबरोबर अशाप्रकारचा व्यवहार करू शकत नाही. रायडू न्यूझीलंडला गेला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याला विश्वचषकात संधी मिळाली नाही कारण, आयपीएलमध्ये त्याने चांगली कामगिरी केली नव्हती. अशा निर्णयांना विरोध करणे गरजेचे आहे,” असेही ते म्हणाले.
टी२० विश्वचषकातही भारतीय संघाकडून होऊ शकते चूक-
युवराज म्हणाला की, “जेव्हा मी २००३च्या विश्वचषकात खेळलो होतो, तेव्हा मी ४० ते ५० सामने खेळले होते. तुम्ही ३-४ सामने खेळणाऱ्या खेळाडूंंबरोबर विश्वचषक खेळू शकत नाही. आता टी२० विश्वचषक येणार आहे. यामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या खेळाडूंपेक्षा अनुभवी खेळाडूंची आवश्यकता आहे.”
“निवडकर्त्यांना (Selector) संघाच्या अशा निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. परंतु शेवटी निवडकर्ते तर काय बोलणार, ते स्वत:च ४-५ सामने खेळलेले असतात. तेदेखील तसाच विचार करत असणार. संघाबद्दल काही माहित नाही आणि विचार करायचा की, हा खेळाडू मला आवडतो तसेच चांगले शॉट्स खेळू शकतो त्यामुळे त्याला टी२० विश्वचषकात संधी दिली जाते,” असेही तो पुढे म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-एकाच वनडेत ओपनिंग गोलंदाजी व ओपनिंग फलंदाजी करणारे ५ भारतीय
-भारतीय वंशाचे ‘हे’ पाच खेळाडू, ज्यांनी परदेशी संघांचे केले नेतृत्व
-टीम इंडियाचे ४ असे कर्णधार, जे फारसे कुणाच्याही लक्षात नाहीत…