भारतीय संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीमध्ये युवराज वडील बनला होता. त्यावेळी त्याने त्याच्या बाळाचा फोटो किंवा नाव जाहीर केले नव्हते. पण १९ जूलै म्हणजेच ‘फादर्स डे’च्या मुहूर्तावर त्याने त्याच्या मुलाचा फोटो आणि त्याचे नाव देखील सार्वजनिक केले आहे.
फादर्स डेच्या मुहूर्तावर युवराजने त्याची पत्नी हेजल कीच आणि मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटोसोबतच त्याने मुलाच्या नावाचीही घोषणा केली आहे. युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि हेजलने त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव ओरियन कीच सिंग असे ठेवले आहे. म्हणजेच त्याच्या नावात आई आणि वडील दोघांच्या नावाचा समावेश केला गेला आहे. जानेवारी महिन्यात आई वडील बनलेल्या या जोडप्याने तब्बल ५ महिन्यांनंतर त्यांच्या मुलाचा फोटो आणि नाव चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून युवराजने ही पोस्ट केली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “या जगात तुझे स्वागत आहे, ओरियन कीच सिंग. मम्मी आणि डॅडी त्यांच्या ‘पुत्तर’वर खूप प्रेम करतात. तुझ्या प्रत्येक हास्यात डोळे असे चमकतात, जसे की तुझे नाव चांदण्यांमध्ये लिहिलेले आहे.” युवराज आणि त्याच्या गोड कुटुंबासाठी चाहत्यांकडून पोस्टवर मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत आहेत. फोटोसाठी चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहे.
Welcome to the world 𝗢𝗿𝗶𝗼𝗻 𝗞𝗲𝗲𝗰𝗵 𝗦𝗶𝗻𝗴𝗵 ❤️. Mummy and Daddy love their little “puttar”. Your eyes twinkle with every smile just as your name is written amongst the stars ✨ #HappyFathersDay @hazelkeech pic.twitter.com/a3ozeX7gtS
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) June 19, 2022
युवराज सिंगला भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान क्रिकेटपटूंमध्ये गणले जाते. टी-२० विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेत युवराजने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला मारलेले ६ चेंडूतील ६ षटकार आजही प्रत्येक चाहत्याच्या डोळ्यासमोर जसेच्या तशे येतात. मधल्या काळात युवराजने कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन देखील केले होते.
युवराजने २०१६ साली बॉलिवुड अभिनेत्री हेजल कीचसोबत लग्न केले. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी या दोघांनी सुखी संसाराला सुरुवात केली होती. आश्चर्याची बाब ही आहे की, युवराज जरी एक दिग्गज क्रिकेटपटू असला, तरी त्याच्या पत्नीला मात्र क्रिकेटमध्ये आवड नाहीये. एका कार्यक्रमात बोलताना युवराजने खुलासा केला होता की, हेजलला लग्नासाठी तयार करताना त्याला खूप कष्ट घ्यावे लागले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
नाणेफेकीच्या बाबतीत कर्णधार पंतला नाही मिळाली नशिबाची साथ, नावावर झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
जेव्हा पावसामुळे तब्बल १२ दिवस चालला होता कसोटी सामना, तरीही नव्हता लागला निकाल