साल २००७चा पहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा भारतीय संघासाठी अविस्मरणीय ठरली. भारतीय संघाची या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी राहिली होती.अगदी पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत या स्पर्धेत अनेक विक्रम झाले. काही विक्रम भारतीय संघातून झाले काही विक्रम दुसऱ्या संघांनी केले. भारतीय संघातून झालेला एक विक्रम म्हणजे, भारतीय चाहते कधीही न विसरणारा युवराज सिंगचा ६ चेंडूत सलग ६ षटकारांचा. या विक्रमाबद्दल युवराजने प्रतिक्रिया दिली आहे.
युवराजने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात सहा चेंडूत ६ षटकार मारून इतिहास रचला होता. टी-२० सामन्यात सहा चेंडूत ६ षटकार मारणारा युवराज सिंग पहिला खेळाडू ठरला. इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडविरुद्धच्या षटकात युवराजने हा पराक्रम करत क्रिकेट जगात खळबळी उडवली होती. युवराजने जेव्हा सहा चेंडूत ६ षटकार मारले तेव्हा त्याच्यासह नॉन-स्ट्रायकर एन्डला उभा होता तो म्हणजे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी.
युवराजने सांगितले की, “माझाहून जास्त खुश धोनी होता, तो मला म्हणाला एका कर्णधारासाठी त्याच्या खेळाडूने ६ चेंडूत सलग ६ षटकार मारल्याचा दुसरा आनंद नाही. तसेच सहा चेंडूत ६ षटकार आल्यामुळे धावसंख्या जगदगतीने पुढे गेली आणि सर्वात मोठी गोष्ट हीच होती की, इंग्लंड विरुद्ध आमच्यासाठी करो किंवा मरो असा सामना होता आणि कुठल्या परिस्थितीत सामना जिंकायचा होता. त्यामुळे धोनी खूपच खूश होता”.
युवराजने या सामन्यात सहा चेंडूत ६ षटकार तर मारलेच परंतु, त्याने ह्या सामन्यात त्याने १२ चेंडूत ५० धावाही कुटल्या. भारताने हा सामान १७ धावांनी जिंकला होता.
युवराजने आजवर ३०३ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि ३६.५च्या सरासरीने एकदिवसीय सामन्यात ८७०१ धावा केल्या आहेत. कसोटीत युवराजने ४० सामने खेळले आहेत ३३.९च्या सरासरीने १९०० धावा केल्या आहेत. आणि ५८ टी-२० सामन्यात २८च्या सरासरीने ११७७ धावा केल्या आहेत. युवराज भारतासाठी नेहमीच उत्कृष्ट ‘मॅच फिनिशर’ राहिला आहे. २००७ आणि २०११ च्या विश्वचषकात युवराजचे योगदान हे अमूल्य होते.
महत्त्वाच्या बातम्या –
कॅचिंग प्रॅक्टिसची ही पद्धत तुम्हालाही करेल अचंबित, पाहा जबरदस्त व्हिडिओ
चक्क १० व्या क्रमांकावर फलंदाजीला सुरुवात करूनही भविष्यात ‘तो’ न्यूझीलंडचा स्टार सलामीवीर बनला
‘सबका बदला लेगा तेरा व्हाइट वॉकर!’, अश्विनच्या ‘त्या’ ट्विटवर जाफरचा भन्नाट रिप्लाय