---Advertisement---

Team India । ‘व्हाइट बॉल क्रकेट अश्निनचा पिंड नाही…’, माजी सहकाऱ्यानेच नाही दिली अश्विनची साथ

On: रविवार, जानेवारी 14, 2024 7:52 PM
ravichandran Ashwin
---Advertisement---

भारताचा माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंग नेहमीच आपल्या आक्रमक स्वभावासाठी चर्चेचा भाग ठरतो. मग तो मैदानात असो किंवा मैदानाबाहेर. यावेळी युवराजने भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन विषयी आपल मत मांडल आहे. कोलकत्यामध्ये ‘युवराज सिंग सेंटर फॉर एक्सीलेंस’ च्या उद्घाटन कार्यक्रमात एका वृत्तसंस्थेशी युवराजने संवाद साधला.

युवराज सिंग (Yuvraj Singh) याला विचारण्यात आले की, अश्विनला व्हाइट बॉल क्रिकेट मधून डावललं जात आहे, अस तुला नाही का वाटत? यावर बोलताना युवराज म्हणाला, “अश्विन एक चांगला गोलंदाज आहे, परंतु मला नाही वाटत की तो वनडे आणि टी20 मध्ये खेळण्यासाठी पात्र आहे. तो चांगली गोलंदाजी करतो पण फलंदाजीच काय? कसोटीसाठी तो नक्कीच पात्र आहे परंतु व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये मला तसे वाटत नाही.” युवराज सिंग नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. यावेळीही त्याचा हा स्वभाव दिसून आला.” (yuvraj-singh-says-r-ashwin-does-not-deserve-place-in-odi-and-t20i-team)

अश्विनने गाजवलय कसोटी क्रिकेट
अश्विन हा भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे नंतर सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या नावे आजवर 490 विकेट आहेत. क्रिकेटच्या या प्रकारात त्याने 23.69 च्या सरासरीने गोलंदाजी केली आहे. एका सामन्यात 5 विकेट घेण्याची कामगीरी त्याने 34 वेळा केली आहे. तर सामन्यात 10 विकेट घेण्यात त्याल 8 वेळा यश आले आहे. या प्रकारात त्याने फलंदाजीसुद्धा चांगली केली आहे. 26.83 च्या सरासरीने त्याने आजवर कसोटी क्रिकेटमध्ये 3193 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतक त्याच्या नावावर आहेत.

कसोटीच्या तुलनेत वनडे आणि टी20 ची कामगीरी साधारन
वनडे आणि टी20मध्ये अश्निन कसोटीसारख यश नाही मिळवू शकला. वनडेच्या 116 सामन्यात 156 विकेट तर टी20च्या 65 सामन्यात 72 विकेट त्याने मिळवल्या आहेत. क्रिकेटच्या या दोन्ही प्रकारात फलंदाज म्हणून त्याने वनडेत 16.44 च्या सरासरीने तर टी20 मध्ये 26.28 च्या सरासरीने त्याने धावा केल्या आहेत. युवराजच्या प्रतिक्रियेवर अश्विनने मी त्याच्या मताचा आदर करतो असे पत्रकार परिषदेत म्हटले.

महत्वाच्या बातम्या 
IPLच्या पहिल्या हंगामातील ऑरेंज कॅप विजेत्या मार्शचा क्रिकेटला अलविदा, आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वीच माजवली होती खळबळ
IND vs ENG Test: ‘राहुल इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत यष्टीरक्षण करणार नाही?’ पाहा बीसीसीआयने का घेतला निर्णय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---