---Advertisement---

मस्ती-मस्तीत गेलने म्हटला हिंदी डायलॉग; केलं सोशल मीडियावर स्वत:चंच हसू

On: सोमवार, मार्च 16, 2020 12:08 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आणि भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग हे खूप चांगले मित्र आहेत. ते अनेकदा मैदानाबाहेर मस्ती करताना दिसत असतात. त्यांचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे.

युवराजने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात युवराज सुरुवातीला मागे थांबलेला दिसतो आणि थोड्या वेळात तो गायब होतो. त्यानंतर गेल एक हिंदी डायलॉग बोलताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B9v3ZFFjMVa/?utm_source=ig_web_copy_link

 

“कॉन्फिडेंस मेरा! कब्र बनेगी तेरी,” असे गेलने यावेळी म्हटले आहे. त्याचा असा डायलॉग संपताच दोघेही जोरात हसू लागतात. यापुर्वीही गेल आणि युवराज अनेकदा सोबत मस्ती करताना दिसले आहेत. गेल्या २ कॅनडा लीगमध्ये आणि टी१०मध्येही दोघांना सोबत पार्टी करताना पाहण्यात आले होते.

युवराज रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये इंडिया लिजंड्स संघाकडून खेळत होता. मात्र, कोरोना व्हायरसमुळे ही सीरिज स्थगित करण्यात आली आहे. तर, गेलने मंजासी सुपर लीगनंतर क्रिकेट खेळलेले नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---