भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने मोहम्मद कैफबरोबर इंस्टाग्राम लाईव्ह चॅट केले होते. या दरम्यान त्याने आयपीएलबद्दल मोठा खुलासा केला आहे.
यावेळी कैफबरोबर (Mohammad Kaif) बोलताना युवराज (Yuvraj Singh) म्हणाला की, “आयपीएलच्या लिलावामध्ये एखाद्या संंघाने मोठ्या रकमेने तुम्हाला संघात घेतल्यानंतर तुमच्यावर दबाव असतो. मी असे नाही म्हणत की यामुळे खेळाडूवर दबाव येतो. परंतु जेव्हा तुम्ही प्रगती किंवा चांगली कामगिरी करत नसता, तेव्हा काही लोक तुम्हाला कमीपणा दाखवू लागतात.”
“दबाव या कारणामुळे असतो कारण जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा म्हटले जाते की एवढे सारे पैसे मिळत आहेत. तर हा खेळाडू चांगले प्रदर्शन का करत नाही. नकारात्मक गोष्टी अधिक दिसतात. त्यामुळे तुमच्यावर गोष्टींचा परिणाम होतो. मी युवा खेळाडूंना सल्ला देईल की, त्यांंनी टी.व्ही. आणि वृत्तपत्रांपासून दूर राहिले पाहिजे,” असेही यावेळी युवराज म्हणाला.
युवराज हा आयपीएल लिलावाच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. सर्वप्रथम त्याला २०१४मध्ये १४ कोटी रुपये त्यानंतर २०१५मध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने १६ कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले होते. तरीही या मोसमात त्याने फार चांगली कामगिरी केली नव्हती. यावेळी त्याने १४ सामन्यांमध्ये केवळ २४८ धावा केल्या होत्या.
आयपीएल २०१९ हा युवराजचा आयपीएलमधील शेवटचा मोसम होता. यावेळी तो मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) प्रतिनिधित्व करत होता. तरीही या मोसमात त्याला केवळ ४ सामनेच खेळण्याची संधी मिळाली होती.
युवराजने मागील वर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तरीही तो सध्या काही लीगमध्ये खेळताना दिसतो. तसेच त्याने स्पष्ट केले आहे की, त्याला पूर्णवेळ समालोचन करण्यात काहीही रस नाही. याव्यतिरिक्त त्याला कोचिंग जास्त आवडते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आणि थेट शिला की जवानी गाण्यावर ऑस्ट्रेलियाच्या वाॅर्नरने व मुलीने धरला ठेका
-फक्त एक आणि एकच टी२० सामना खेळायला मिळालेले ५ भारतीय खेळाडू
-२०१०पासून चौथ्या क्रमांकावर वनडेत सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय