भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने भारताचा सध्याचा फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोडवर निशाना साधताना त्यांच्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
राठोड यांची मागीलवर्षी संजय बांगर यांच्याऐवजी भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्याबद्दल इंस्टाग्रामवर बोलताना युवराज म्हणाला, ‘राठोड माझा मित्र आहे. तूम्हाला असे वाटते का की तो टी२०च्या काळातील या खेळाडूंना मदत करु शकेल? तो त्या स्थरावर क्रिकेट खेळला आहे का की तो त्यांना मदत करु शकेल?’
राठोड यांनी १९९६ आणि १९९७ च्या दरम्यान ६ कसोटी आणि ७ वनडे सामने खेळले आहेत.
तसेच युवराजने म्हटले आहे की वेगवेगळ्या खेळाडूंना वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले पाहिजे. ‘जर मी प्रशिक्षक असतो तर मी जसप्रीत बुमराहला रात्री ९ वाजता गुडनाईट केले असते आणि हार्दिक पंड्याला रात्री १० वाजता बाहेर ड्रिंक्सला घेऊन गेलो असतो. अशा वेगवेगळ्या खेळाडूंशी वेगवेगळ्या पद्धतीने वागावे लागते,’ असे २०११ च्या वनडे विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार मिळवणारा युवराज म्हणाला.
एवढेच नाही तर युवराजने ‘सध्याच्या खेळाडूंकडे सल्ला घेण्यासाठी आणि बोलण्यासाठी कोणी नाही,’ असे म्हणत भारताचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावरही अप्रत्यक्षरित्या टिका केली आहे. हे शास्त्रींचे काम नाही का असे विचारले असता युवराज म्हणाला, ‘मला माहित नाही की रवी हे करत आहे की नाही, परंतु कदाचित त्याच्याकडे इतर कामे आहेत.’
‘जाऊ दे, तूम्ही सर्वांना असे सांगू शकत नाही की ‘जा आणि तूमचा खेळ खेळा’ हा दृष्टीकोन सेहवाग सारख्या खेळाडूंसाठी मदतशीर ठरेल पण पुजारासाठी हा दृष्टीकोन काम करणार नाही. म्हणून या गोष्टी सपोर्ट स्टाफच्या लक्षात येण्याची गरज आहे,’ असेही युवराज म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी –
‘गोलंदाजांच्या मदतीसाठी त्यांना बॉल टेंपरिंगची परवानगी दिली पाहिजे’
चहल एक्सप्रेस काही थांबायचे नाव घेईना, आता थेट कॅटरिनाच्या पोस्टवर केली ‘ही’ कमेंट
धोनी आज जो आहे तो केवळ ‘त्या’ गोष्टींमुळेच