कोरोना व्हायरसमुळे मागील एक-दोन महिन्यात खेळाडूंनी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे वळवलेला दिसतो. अशामध्ये भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल क्रिकेटच्या मैदानात असो किंवा मैदानाबाहेर परंतु तो नेहमी चर्चेत असतो. तो भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील खेळाडूंपैकी सर्वात मजा-मस्करी करणारा खेळाडू आहे.
तसेच चहल (Yuzvendra Chahal) संघसहकाऱ्यांच्या सोशल मीडियावरील लाईव्ह चॅट किंवा पोस्टवर नेहमी कमेंट करतो. त्याच्या कमेंट्समुळे तो नेहमी चर्चेचा विषय ठरत असतो. असाच तो आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
परंतु यावेळी त्याने कोणत्या संघसहकाऱ्याच्या पोस्टवर नाही तर चक्क बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफच्या (Katrina Kaif) इंस्टाग्राम लाईव्ह चॅटवर कमेंट केली आहे.
कॅटरिना इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमार्फत आपल्या चाहत्यांशी चर्चा करत होती. यादरम्यान चहलने एन्ट्री मारत तिच्या लाईव्ह चॅटवर ‘हाय कॅटरिना मॅम’ अशी एक कमेंट केली.
चहलने केलेल्या कमेंटवर चाहत्यांची नजर पडली आणि लगेच या कमेंटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच चहलची कमेंट असणाऱ्या स्क्रीनशॉटला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे.
यापूर्वी चहलने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनच्या लाईव्ह चॅटदरम्यान कमेंट केली होती. तसेच त्याने जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) इंस्टाग्राम लाईव्ह चॅटदरम्यानही कमेंट केली होती.
चहलने भारताकडून आतापर्यंत ५२ वनडे सामने आणि ४२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने वनडेत ९१ तर टी२०त ५५ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-एकाच दिवसात दोन वेळा पुर्ण टीम बाद होण्याच्या ४ घटना
-रोहित- रैना तयार केली सीएसके- मुंबईची मिळून जबरदस्त ड्रीम ११
-चहलने विचारलं असा काही प्रश्न, युवराज म्हणाला; रोहित- रैनाचे गाल पहा