---Advertisement---

पोलार्डने सहा षटकरांच्या विक्रमाची बरोबरी केल्यावर युवराजने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाला…

On: गुरूवार, मार्च 4, 2021 6:10 PM
---Advertisement---

वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांच्यादरम्यान तीन टी२० सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून (३ मार्च) ऍन्टिग्वा येथे सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात यजमान वेस्ट इंडीजने श्रीलंकेवर ४ गडी राखून मात केली. वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने एकाच षटकात मारलेले सलग सहा षटकार या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. पोलार्डच्या या पराक्रमानंतर यापूर्वी सहा षटकार मारणाऱ्या भारताच्या युवराज सिंगने ट्विट करत त्याचे अभिनंदन केले आहे.

पोलार्डने मारले सहा षटकार
वेस्ट इंडीजच्या डावातील सहाव्या शतकात गोलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या अकीला धनंजया याच्या गोलंदाजीवर वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने सलग सहा षटकार खेचले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा हर्शल गिब्स याने वनडे सामन्यात, तर भारताच्या युवराज सिंगने टी२० सामन्यात एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याची किमया केली होती. त्यानंतर या यादीमध्ये आता पोलार्डचा समावेश झाला आहे.

युवराजने केले अभिनंदन
पोलार्ड सहा षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये सामील झाल्यानंतर यापूर्वी टी२०क्रिकेटमध्ये सहा षटकार मारणाऱ्या भारताच्या युवराज सिंगने त्याचे ट्विट करुन अभिनंदन केले. युवराजने ट्विट करताना लिहिले, ‘तुझे या क्लबमध्ये स्वागत आहे पोलार्ड.. सहा षटकार खूपच छान’

या ट्विटसह त्याने सहा चांदण्यांची इमोजीदेखील टाकली आहे. युवराजने २००७ टी२० विश्वचषकावेळी इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड याला एकाच षटकात ६ षटकार खेचण्याची कामगिरी केली होती. तसेच, दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हर्षेल गिब्स याने २००७ वनडे विश्वचषकावेळी सलग सहा षटकार ठोकले होते.

https://twitter.com/YUVSTRONG12/status/1367353789687074816

पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा विजय
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात वेस्ट इंडीजने सहज विजय साकार केला. श्रीलंकेने दिलेले १३२ धावांचे आव्हान वेस्ट इंडीजने १३.१ शतकात पूर्ण केले. पोलार्डने ११ चेंडूमध्ये ३८ तर, जेसन होल्डरने नाबाद २८ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. मालिकेतील दुसरा सामना ५ मार्च रोजी खेळला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या –

जसप्रीत बुमराहच्या लग्नाचे ठिकाण ठरले? ‘या’ स्थळी होणार शुभमंगल

इम्रान ताहिरची संवेदनशीलता, विकेट घेताच ‘ही’ कृती करत वाहिली मित्राला श्रध्दांजली

एक, दोन नव्हेत तर तब्बल सलग सात षटकार! ‘या’ गोलंदाजाच्या नावे नकोसा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---