---Advertisement---

ईशांतच्या आवाजाची नक्कल करत युवराजने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात ईशांत शर्माला भारतीय संघाच्या अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळालेली नाही. त्याला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. असे असले तरी गुरुवारचा (२ सप्टेंबर) दिवस ईशांतसाठी खास होता. त्याने गुरुवारी आपला ३३ वा वाढदिवस साजरा केला आहे.

त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने देखील एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय संघाचा माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले आहे. तर, तो सोशल मीडियावर सक्रिय राहून खेळाडूंची पायखेची करतो आणि मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो. दरम्यान, त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे,ज्यामध्ये तो ईशांत शर्माच्या आवाजाची नकल करताना दिसून येत आहे.

ईशांत शर्मा आणि युजराज सिंग हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. गेली अनेक वर्ष दोघांनी एकत्र क्रिकेट खेळले आहेत. वाढदिवसाच्या खास दिवशी त्याने खास शुभेच्छा दिल्या आहेत.

युवराजने या व्हिडिओमध्ये ईशांत शर्माच्या आवाजाची नक्कल करत म्हटले की, “अरे लंबू, आज तुझा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लंबू, मी आशा करतो की तू ठीक असशील. भारताला विजय मिळवूनच ये. तू पण बोलत असशील की, युवी भाई माझ्या आवाजात का बोलत आहे, परंतु माझा आणि तुझा आवाज तर एकसारखाच आहे ना.” युवराजने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहते देखील आपल्या मजेशीर प्रतिक्रीया देत आहेत.(Yuvraj Singh wishing ishant sharma on his birthday,watch funny video)

https://www.instagram.com/p/CTT_gWnhGpU/?utm_source=ig_web_copy_link

तसेच भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने देखील ट्विट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.त्याने लिहिले की,” मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, दरवर्षी तू यशाचे उंच शिखर गाठ..”

याशिवायदेखील यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि रिषभ पंतनेही ईशांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ईशांतने भारताकडून आत्तापर्यंत १०४ कसोटी सामन्यात ३११ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ८० वनडे सामन्यात ११५ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘आम्ही असा संघ तयार केला, ज्याला पराभूत करण्याचा सर्वांचा प्रयत्न’, शास्त्रीबरोबरच्या संबंधाबद्दल विराटचे भाष्य

आयसीसीने मदत न केल्याने देश सोडण्याची पाळी आली, अफगाणिस्थानच्या महिला क्रिकेटरने मांडली व्यथा

ठाकूर तुला मानलं! अवघ्या ३१ चेंडूंमध्ये अर्धशतक करत शार्दुलने इंग्लंडमध्ये रचला इतिहास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---