ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामी फलंदाज डेविड वॉर्नर आपल्या इंस्टाग्रामवरुन नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसून येतो. वॉर्नर ट्रेंडमध्ये चालल्या कोणत्याही अॅपचा वापर करण्यात कधी मागे राहत नाही. यामुळे चाहत्यांना त्याच्या इंस्टाग्रामवरील व्हिडिओ आवडतात. वॉर्नरचे चाहते फक्त ऑस्ट्रेलियामध्येच नाही, तर भारतामध्ये भरपूर प्रमाणात आहेत.
सोशल मीडियावर वॉर्नर आहे लोकप्रिय
टिकटॉक पासून फेस स्वॅप अॅप पर्यंत कोणत्याही अॅपच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करण्यापासून मागे हटत नाही. परंतू भारतामधे सोशल मीडिया युजर्स मध्ये तो आपल्या पत्नी आणि मुलीसोबत ‘बट्टा बोंम्मा’ या डान्स व्हिडिओसाठी भारतात खुप लोकप्रिय आहे. याशिवाय त्यांचे अजून बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. केवळ फलंदाज म्हणून नाही तर त्याच्या मनोरंजक व्हिडिओंमुळेही त्याला चाहते खुप पसंत करतात
दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर आहे. डेविड वॉर्नर फेस स्वॅप अॅप वापरून आपला चेहरा बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनच्या चित्रपटातील व्हिडिओवर आपला चेहरा वापरून व्हिडिओ तयार करत आहे. तो व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याखाली लिहिले की, “लोकांच्या मागणीमुळे परत येत आहे.”
https://www.instagram.com/p/CI2osoHFv9y/?utm_source=ig_web_copy_link
युवराज सिंगने दिली प्रतिक्रिया
हृतिक रोशन च्या चेहर्यावर आपला चेहरा लावून पोस्ट केलेल्या डेविड वॉर्नरच्या व्हिडिओवर युवराज सिंगने मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. युवराज प्रतिक्रिया देताना म्हणाला, “डेविड रोशन”. त्यामुळे वॉर्नरचा व्हिडिओ आणखीनच मजेदार झाला आहे. त्यावर खुप गमतीशीर प्रतिक्रिया येत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
– AUS vs IND Test Live : बर्न्सच्या अर्धशतकी खेळीने कांगारूचा भारतावर ८ विकेट्सने विजय; १-० ने घेतली आघाडी
– टीम इंडियाचा लाजीरवाणा पराक्रम आणि माजी खेळाडूंच्या तिखट प्रतिक्रिया, चाहत्यांकडूनही मीम्सचा भडीमार
– अब जिंदा रेहने के लिये बचा ही क्या है! टीम इंडियाच्या वाईट प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस