---Advertisement---

राजस्थानच्या कॅम्पमध्ये मस्तीचे वारे, चहल-बटलरचा ‘बल्ले नी बल्ले’ गाण्यावर डान्स; सिग्नेचर पोजही केली

On: शनिवार, मे 7, 2022 5:51 PM
Chahal & Buttler Dance
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील साखळी फेरी सामने संपायला आले आहेत. त्यामुळे हळूहळू प्लेऑफचे चित्रपटही स्पष्ट होत आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स संघांसह राजस्थान रॉयल्स संघही प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहे. राजस्थानला हे यश साध्य करून देण्यात त्यांचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि सलामीवीर जोस बटलर यांचा मोठा हात आहे. एकीकडे बटलर राजस्थानलाठी खोऱ्याने धावा काढत आहे, तर दुसरीकडे चहल भल्याभल्या फलंदाजांना त्याच्या फिरकीच्या जाळ्यात फसवताना दिसतोय. 

दरम्यान या दोन्ही खेळाडूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हे खेळाडू थिरकताना दिसत आहेत. राजस्थान संघाने (Rajasthan Royals) त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

बल्ले नी बल्ले गाण्यावर केला डान्स
चार्टबस्टर गाणे ‘बल्ले नी बल्ले’ या गाण्यावर चहल (yuzvendra Chahal) आणि बटलर (Jos Buttler) थिरकताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दिसते की, दोन्हीही खेळाडू स्टेप्स फॉलो करत नाचायला सुरुवात करतात. या गाण्याच्या शेवटी चहल त्याची सिग्नेचर पोज करतो. तो गाण्याच्या शेवटी जमीनीवर झोपतो आणि एक हात डोक्याखाली व एक हात पायावर ठेवून पोज देतो. बटलरही त्याला साथ देत त्याच्या पोजची नक्कल (Yuzvendra Chahal Signature Pose) करतो. शेवटी या दोघांनाही हसू फुटते.

मैदानावर आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर विरोधी संघाला थिरकवणाऱ्या या खेळाडूंना पंजाबी गाण्यावर ठेका धरताना (Chahal & Buttler Dance) पाहून चाहते खुश झाले आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

https://www.instagram.com/reel/CdM5jr0lKUI/?utm_source=ig_web_copy_link

अशी प्रसिद्ध झाली चहलची ती पोज
एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी चहलला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आली नव्हती. यावेळी तो १२वा खेळाडू म्हणून संघाशी जोडला गेलेला होता. सहसा १२ वा खेळाडू सीमारेषेजवळ बसलेला असतो आणि सामन्यादरम्यान खेळाडूंना ड्रिंक्स पुरवण्याचे काम करतो. परंतु चहल त्यावेळी बसण्याऐवजी चक्क सीमारेषेबाहेर आरामात लोळत सामना पाहात होता. त्याची ही पोज त्यावेळी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती आणि त्यावर मीम्सही बनले होते. आता याच पोजने चहल चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---