भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये बुधवारपासून (१९ जानेवारी) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. कसोटीतील पराभव विसरून भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत धमाकेदार कामगिरी करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. भारताची नजर आफ्रिकेच्या भूमीवर सलग दुसरी एकदिवसीय मालिका जिंकण्यावर आहे. २०१८ साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने सहा सामन्यांची एकदिवसीय मालिका ५-१ अशी जिंकली होती.
दरम्यान, बुधवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मलिकेत काही खेळाडू त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचे टप्पे गाठण्याच्या जवळ उभे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे फिरकीपटू युजवेंद्र चहल. चहलला अंतिम ११ मध्ये स्थान मिळेल की नाही याबाबत साशंकता कायम आहे. पण, जर मिळाले तर तो काही विक्रम आपल्या नावावर करु शकतो.
युजवेंद्र चहलला जर संधी मिळाली तर एकदिवसीय कसोटीमध्ये आपल्या १०० विकेट्स पूर्ण करु शकतो. चहल हे स्थान गाठण्यापासुन फक्त तीन विकेट्सने दूर आहे. चहलने आत्तापर्यंत ५६ एकदिवसीय सामने खेळले असून ९७ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. या दरम्यान त्याची इकोनॉमी रेट ५.२० आहे.
याबरोबच युजवेंद्र चहल हा दक्षिण आफ्रिकेत द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज होण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे. सध्या हा विक्रम त्याचा जोडीदार कुलदीप यादवच्या नावावर आहे. कुलदीपने १७ तर चहलने १६ गडी बाद केले आहेत. चहल कुलदीपचा विक्रम मोडण्यापासून दोन विकेट दूर आहे. भारतीय संघाच्या मागील दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान चहल आणि कुलदीप यांनी या विकेट्स घेतल्या होत्या.
भारताने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेत सहा सामन्यांची एकदिवसीय मालिका ५-१ ने जिंकली होती. या विजयात चहल आणि कुलदीपचा मोठा वाटा होता.
महत्त्वाच्या बातम्या –
पहिल्या वनडेसाठी संभाव्य ‘टीम इंडिया’! एकाचे पदार्पण तर, दोघांचे पुनरागमन
ओडिशा एफसीने अखेर शोधला विजयाचा मार्ग; नॉर्थ ईस्टवर २-० ने मात
टीम इंडियाला दिलासा! दक्षिण आफ्रिकेचा ‘सबसे बडा मॅचविनर’ वनडे मालिकेतून बाहेर