इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने बुधवारी (१६ मार्च) असे काही केले आहे, ज्यामुळे क्रिकेट चाहते गोंधळले आहेत. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावापूर्वी राजस्थान संघाने घोषणा केली होती की, संजू सॅमसन (Sanju Samson) हाच फ्रँचायझीच्या कर्णधारपदी कायम असेल. मात्र आता बुधवारी राजस्थानने ट्वीट करत सांगितले आहे की, फिरकीपटू युझवेंद्र चहल राजस्थान संघाचा नवा कर्णधार (Rajasthan Royals New Captain) असेल. राजस्थानच्या या अधिकृत घोषणेनंतर चाहते चकित झाले आहेत.
Meet RR new captain @yuzi_chahal 🎉 🎉 pic.twitter.com/ygpXQnK9Cv
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 16, 2022
चहल (Yuzvendra Chahal) राजस्थानचा (Rajasthan Royals) कर्णधार बनल्याचे ट्वीट बुधवारी दुपारी १२ वाजून ५६ मिनिटांनी केले गेले होते. त्याच्या ८ मिनिटांपूर्वीच म्हणजे दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांनी राजस्थानने चहलच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना ट्वीट केले होते की, ‘राजस्थान रॉयल्समध्ये ट्वीटर अकाउंटमध्ये लॉगिन केले आहे. म्हणालो होतो, ऍडमिन पंगा घेऊ नका.’
तत्पूर्वी चहलच्या ट्वीटमध्ये लिहिले गेले होते की, ‘हाहाहा, आता मजा येणार. जॅकलश मॅक्रम पासवर्डसाठी धन्यवाद.’
RR me twitter account me in login kar Diya hai … bola tha admin job pange mat Lena 🤣🤣 https://t.co/k3yNd6VsEx
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 16, 2022
या ट्वीट्सवरून चाहते अंदाज लावत होते की, राजस्थान रॉयल्सचे ट्वीटर अकाउंट हॅक झाले आहे किंवा राजस्थानचा संघ चाहत्यांसोबत मस्ती करतोय. अखेर राजस्थान संघाने स्वत: ट्वीट करत माहिती दिली होती की, त्यांचे ट्वीटर अकाउंट हॅक झाले आहे.
राजस्थान संघाने जोस बटलरच्या सोशल मीडिया अकाउंटचा स्क्रिनशॉट ट्वीटरमध्ये जोडत आपले अकाउंट हॅक (Rajasthan Royals Twitter Account Hack) झाल्याची माहिती दिली होती. या स्क्रिनशॉटमध्ये राजस्थान संघाच्या ट्वीटर ऍडमिनने बटलरला वैयक्तिक मैसेज पाठवल्याचे दिसते. ‘हाय जोश बेबी, आय लव्ह यू सो मच, असा मैसेज त्याला पाठवला गेला होता.’ याव्यतिरिक्तही बरेचसे गमतीशीर ट्वीट्स राजस्थानच्या ट्वीटर अकाउंटवर केले गेले होते.
Account was hacked, ignore all tweets and DMs 🙄 pic.twitter.com/VTZsn7B35P
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 16, 2022
असे असले तरीही, राजस्थान संघाचे ट्वीटर अकाउंट हॅक झाले नव्हते. तर त्यांनी चहलसोबत मस्ती केली होती. कारण यापूर्वी राजस्थानच्या एका ट्वीटवर प्रतिक्रिया देताना चहल म्हणाला होता की, तो त्यांचे ट्वीटर अकाउंट हॅक करेल. त्याचे हेच भाष्य खरे सिद्ध करण्यासाठी राजस्थान संघाने त्याची फिरकी घेतली होती.
राजस्थान रॉयल्स संघ – संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, ओबेद मॅकॉय, अनुनय सिंग, कुलदीप सेन, करुण सेन , ध्रुव जुरेल, तेजस बारोका, कुलदीप यादव, शुभम गढवाल, जिमी नीशम, नॅथन कुल्टर-नाईल, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डॅरिल मिशेल
महत्त्वाच्या बातम्या-
विराटसाठी आरसीबीने पाठवलेली चक्क मोडलेली कार, तर इतर खेळाडूंचा चांगली गाडी, वाचा तो किस्सा
भज्जी पुन्हा घेणार ‘फिरकी’, करणार जोरदार ‘फटकेबाजी’; हरभजनच्या नव्या इनिंगला लवकरच सुरुवात?
जो रुटचं विक्रमी २५ वे कसोटी शतक, विलियम्सनला टाकले मागे; आता नजर विराट-स्मिथच्या रेकॉर्डवर