भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युझवेंद्र चहल इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत आपल्या फिरकीची जादू दाखवताना दिसत आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या चहलने आयपीएल 2023 स्पर्धेचा पहिला सामना सामना सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध खेळला. या सामन्यात त्याने हैदराबादच्या विस्फोटक खेळाडूला त्रिफळाचीत करत खास विक्रम नावावर केला. यामुळे त्याने अमित मिश्रा या अनुभवी खेळाडूचा विक्रमही मोडीत काढला.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals) संघात खेळल्या गेलेल्या या सामन्यात युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) चमकला. नाणेफेक गमावत राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट्स गमावत 203 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाच्या नाकी नऊ आल्या. त्यांच्या 6 विकेट्स या 11 षटकात 52 धावांवर पडल्या होत्या. यातील दोन विकेट्स चहल याने घेतल्या होत्या. या विकेट्स घेताच चहलच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.
Wicket number 2⃣ for @yuzi_chahal 👏👏@josbuttler with the catch 😎#SRH 54/6 now as Mayank Agarwal walks back after scoring 27.
Follow the match ▶️ https://t.co/khh5OBILWy#TATAIPL | #SRHvRR pic.twitter.com/bkWlVqwOwp
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
चहलने हैदराबादच्या डावातील 7वे षटक टाकताना सहाव्या चेंडूवर हॅरी ब्रूक (Harry Brook) याला त्रिफळाचीत बाद केले. ही विकेट काढताच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी विराजमान झाला. चहलने या विकेटसह 167 विकेट्स घेतल्या. यावेळी त्याने आयपीएलमध्ये 166 विकेट्स घेणाऱ्या चौथ्या स्थानावरील अमित मिश्रा (Amit Mishra) याला पछाडले. चहलने डावातील दुसरी विकेट मयंक अगरवाल याच्या रूपात घेतली. यानंतर त्याने आदिल रशीद आणि भुवनेश्वर कुमार यांची अनुक्रमे 13.6 आणि 17.5 षटकात विकेट्स काढली. त्यामुळे त्याच्या नावावर आयपीएलमध्ये 170 विकेट्स झाल्या. यासह त्याने लसिथ मलिंगा याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. पुढील सामन्यात चहलकडे हा विक्रम मोडण्याची संधी आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये ड्वेन ब्रावो 183 विकेट्ससह पहिल्या स्थानी, तर चहलही लसिथ मलिंग याच्यासह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. मलिंगाच्या 170 विकेट्स आहेत. याव्यतिरिक्त पाचव्या स्थानी आर अश्विन असून त्याच्या 158 विकेट्स झाल्या आहेत. तसेच, सहाव्या स्थानी पीयुष चावला असून त्याच्या 157 विकेट्स आहेत. याव्यतिरिक्त सातव्या स्थानावरील भुवनेश्वर कुमारच्या 154, आठव्या स्थानावरील सुनील नारायणच्या 153 आणि दहाव्या स्थानावरील हरभजन सिंग याच्या 150 विकेट्स आहेत. (Yuzvendra Chahal in the list of Most wickets in IPL see here)
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
183 – ड्वेन ब्रावो
170 – लसिथ मलिंगा
170* – युझवेंद्र चहल
166 – अमित मिश्रा
157 – आर अश्विन
157 – पीयुष चावला
154 – भुवनेश्वर कुमार
153 – सुनील नारायण
150 – हरभजन सिंग
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सनरायझर्सला बोल्टचा झटका! खाते न खोलू देता हैदराबादचे दोन फलंदाज तंबूत, पाहा व्हिडिओ
उमरानने ताशी 149.3 किमीच्या गतीने पडिक्कलला टाकला चेंडू, स्टंपने मारल्या कोलांटी उड्या; पाहा Video