भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात रविवारी (१८ जुलै) पहिल्या वनडे सामन्याचा थरार रंगणार आहे. कोलंबाच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर दुपारी ३.३० वाजता हा सामना सुरू होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे कर्णधारपद शिखर धवनच्या हाती देण्यात आले आहे. ही वनडे मालिका भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल याच्यासाठी अतिशय खास ठरू शकते. या मालिकेत तो नवीन कीर्तीमान आपल्या नावावर करू शकतो.
युझवेंद्र चहल गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान देऊ शकतो. जर त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये जागा मिळाली तर तो या मालिकेत गडी बाद करण्याचा बाबतीत ‘शतकवीर’ होऊ शकतो. या मालिकेत ८ गडी बाद करताच त्याचा १०० गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत समावेश होईल. त्याने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये ९२ गडी बाद केले आहेत. जर त्याने हा कारनामा केला, तर वनडे क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा तो २२ वा फिरकीपटू ठरेल. यासह तो दिग्गज भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली यांना मागे टाकेल.
चहलने या मालिकेत ९ गडी बाद केले तर, तो सौरव गांगुलीला मागे टाकू शकतो. सौरव गांगुलीने आपल्या वनडे कारकीर्दीत १०० गडी बाद केले होते. (Yuzvendra chahal on the verge of reaching the 100 wickets milestone in india vs srilanka odi series)
सेहवागला मागे टाकण्यासाठी ५ विकेट्सची आवश्यकता
युजवेंद्र चहल हा माजी भारतीय दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवागला मागे टाकण्यापासून अवघे काही पाऊल दूर आहे. जर युजवेंद्र चहलला या मालिकेत ५ गडी बाद करण्यात यश आले तर तो वीरेंद्र सेहवागला मागे टाकणार आहे. सेहवागने आपल्या वनडे कारकिर्दीत ९६ फलंदाजांना माघारी धाडले आहे.
तसेच भारतीय संघासाठी १०० पेक्षा अधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अनेक दिग्गज भारतीय गोलंदाजांचा समावेश आहे. यामध्ये कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, युवराज सिंग यांचा समावेश आहे. त्यामुळे चहलच्या नावाचीही या यादीत भर पडेल.
तसेच भारतीय संघात असेही गोलंदाज होऊन गेले, ज्यांनी वनडे क्रिकेटमध्ये २०० पेक्षा अधिक गडी बाद करण्याचा करणामा केला आहे. यामधे हरभजन सिंग आणि जहीर खान यांचा समावेश आहे. तसेच भारतीय संघासाठी वनडे क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे यांनी सर्वाधिक ३३४ गडी बाद केले आहेत. तर, जवागल श्रीनाथ यांनी ३१५ गडी बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट अन् अनुष्काचे खट्याळ रुप कॅमेरात कैद, लंडनच्या गल्ल्यांमध्ये दिसले मस्ती करताना
SLvIND: माजी क्रिकेटरची मागणी; ३४ सामन्यात ११८ विकेट्स घेणाऱ्या ‘त्या’ जोडीला एकत्र खेळवा
भलाईचा जमानाच नाही! खिलाडूवृत्ती दाखवत रूटने ज्याला जिवनदान दिले, त्यानेच संघाला दिला चोप






