कोलकाता| रविवारी (२१ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा टी२० सामना पार पडला. यजमान भारताने यापूर्वीचे दोन्ही सामने जिंकत मालिका खिशात घातली होती. जयपूर येथे झालेला पहिला टी२० सामना भारताने ५ विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर रांची येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात ७ विकेट्सने सोपा विजय मिळवत भारताने मालिकेवर आपले नाव कोरले.
पुढे उभय संघांमध्ये कोलकाता येथे शेवटचा टी२० सामना खेळला गेला. या सामन्यात अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याला विश्रांती देण्यात आली. त्याच्याजागी फिरकीपटू युझवेंद्र चहल याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्यात आले. या सामन्यातून चहलने टी२० संघात पुनरागमन तर केलेच सोबतच खास विक्रमही आपल्या नावे केला आहे.
३१ वर्षीय चहलचा हा टी२० कारकिर्दीतील ५० वा सामना होता. त्यामुळे मैदानावर उतरताच त्याने आपले टी२० सामन्यांचे अर्धशतक पूर्ण केले. हा विक्रम करणारा तो भारताचा १३ वा खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी अश्विनने जयपूर येथील पहिल्या टी२० सामन्यात हा विक्रम आपल्या नावे केला होता.
Milestone Alert – @yuzi_chahal is all set to play his 50th T20I 👏👏
Go well, Yuzi 🙌#INDvNZ pic.twitter.com/I87oMBL1AQ
— BCCI (@BCCI) November 21, 2021
चहल आणि अश्विनव्यतिरिक्त हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, केएल राहुल, युवराज सिंग, शिखर धवन, सुरेश रैना, विराट कोहली, एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांनी ५० किंवा त्यापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
अशी राहिली आहे युझवेंद्र चहलची टी२० कारकिर्द
चहलला भारतीय संघाचा हुकुमी एक्का म्हटले जाते. २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने भारताकडून ५० टी२० सामने खेळताना ६३ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान २५ धावांवर ६ विकेट्स ही त्याची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी कामगिरी राहिली आहे. तसेच त्याने १ वेळा एका टी२० सामन्यात ५ विकेट्स काढण्याची प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अभूतपूर्व कामगिरी! एकाच डावात १० बळी घेत आफ्रिकेचा अष्टपैलू आला प्रसिद्धीझोतात
टी२० मालिकेनंतर ‘हे’ दोघे करणार दक्षिण आफ्रिकेला प्रयाण; शार्दुलचाही होऊ शकतो समावेश
ईडन गार्डन्सवर भारतीय संघ आहे सरस! अशी राहिली आहे कामगिरी