---Advertisement---

जेव्हा युवराजला पाहून चहलची टरकलेली; म्हणाला, ‘वाटलं होतं ६ षटकार मारेल’

On: बुधवार, एप्रिल 27, 2022 5:47 PM
Yuvraj-Singh-And-Yuzvendra-Chahal
---Advertisement---

भारतीय संघाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करत आहेत. चालू हंगामात चहलने सुरुवातीच्या ८ सामन्यांमध्ये १८ विकेट्स नावावर केल्या आहेत आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. चहल यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळला आहे. आता त्याने युवराज सिंगसमोर गोलंदाजी करतानाचा एक जुना किस्सा सांगितला आहे.

राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मंगळवारी (२६ एप्रिल) त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून चहलचा हा व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्याशी संबंधीत एक खुलाला करत आहे. व्हिडिओत युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) म्हणतो की, “आरसीबी आणि एमआय यांच्यातील एक सामना चिन्नास्वीमी स्टेडियमवर खेळला गेला होता. त्यावेळी मी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळत होतो. त्यावेळी युवी पा (युवराज सिंग) चांगली फलंदाजी करत होता. त्याने माझ्या पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार मारले. जेव्हा तिसरा षटकार मारला, तेव्हा मला वाटले की, आज सहा षटकार लागू शकतात, पण स्वतःवर विश्वास दाखवत चौथा चेंडू तसाच टाकला, जसा मला टाकायचा होता आणि तो बाद झाला. ती एक चांगली आठवण आहे, जी मला नेहमी प्रोत्साहित करत असते.”

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

चालू आयपीएल हंगामात चहलच्या प्रदर्शनावर नजर टाकली, तर त्यामध्ये एका हॅट्रिकचा देखील समावेश आहे. आयपीएल २०२२मध्ये विकेट्सची हॅट्रिक घेणारा चहल पहिला गोलंदाज देखील ठरला. केकेआरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने या हॅट्रिकच्या जोरावर एकूण पाच विकेट्स घेतल्या होत्या. राजस्थानने हा सामना ७ धावांनी जिंकला होता.

दरम्यान, राजस्थानने शेअर केलेल्या व्हिडिओत चहलने सांगितलेला किस्सा चर्चेत आला असला, तरी त्याने काही दिवसांपूर्वी सांगितलेल्या एका किस्स्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. चहलने सांगितलेला हा किस्सा आयपीएल २०१३ मधील होता. त्यावेळी एका विदेशी खेळाडूने दारुच्या नशेत चहलला इमारतीच्या १५व्या मजल्यावरून उलटे टांगले होते. चहलने सांगितल्याप्रमाणे त्यावेळी काहीही होऊ शकत होते. त्याचा जीव देखील जाऊ शकत होता.

चहलच्या या खुलास्यानंतर भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सहेवाग चांगलाच संतापला होता. सेहवागने चहलला त्या विदेशी खेळाडूने नाव उघड करण्यास सांगितले होते, पण चहलने ते केले नाही.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

इंग्लंडचं ठरलं! मिळाला नवीन कसोटी कर्णधार; भारतीय संघाला विश्वविजेता बनवणारा दिग्गज बनणार कोच

झालं गेलं गंगेला मिळालं! ‘नो बॉल विवादा’वर पॉवेलने सोडले मौन; म्हणाला, ‘ही अशी गोष्ट आहे, ज्याला..’

‘तीन-चार फ्रँचायझी खोटे बोलल्या, त्यांनी धोका दिला’, हर्षल पटेलचा मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---