भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज मागच्या वर्षी टी-20 विश्वचषक खेळू शकला नव्हता. आयपीएल 2021 मध्ये चहल जबरदस्त फॉर्ममध्ये होता, पण तरीदेखील विश्वचषक संघात त्याला संधी मिळाली नव्हती. चहलला टी-२० विश्वचषक संघातून वगळल्यामुळे अनेकांनी निवडकर्त्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. तो स्वतः देखील निवडकरत्यांच्या या निर्णयामुले नाराज असल्याचे दिसले होते. पण यावर्षी खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी त्याला संधी दिली गेली आहे. यावर्षीचा टी-२० विश्वचषक ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे.
टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळायच्या आहेत. या दोन्ही मालिकांमध्येही युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. चहल टी-20 विश्वचषकासाठीच्या संघात सहभागी झाल्यामुळे चाहत्यांच्या मनाला काहीशी शांती नक्कीच मिळाली असेल. मागच्या वर्षी चहलच्या जागी संघात ससभागी झालेला राहुल चाहर मात्र यावर्षी कुठेच चर्चेत देखील दिसत नाहीये. दरम्यानच्या काळात चहलने आयपीएल आणि भारतीय संघासाठी जी चमकदार कामगिरी केली, त्याच्या जोरावर आता विश्वचषक संघात पुन्हा स्थान मिळवले आहे.
One title 🏆
One goal 🎯
Our squad 💪🏻#TeamIndia | #T20WorldCup pic.twitter.com/Dw9fWinHYQ— BCCI (@BCCI) September 12, 2022
टी-२० विश्वचषकासाठी निवडला गेलाला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू-
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद. शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्त्व
पुन्हा एकदा बजबॉल ठरले यशस्वी! तीन दिवसांत इंग्लंडने आफ्रिकेला पराभूत करत मालिका टाकली खिशात
सिकंदर रझाने रचला इतिहास! बनला आयसीसीचा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारा पहिला झिम्बाब्वेयन