---Advertisement---

युजवेंद्र चहलने केला जिममधील व्हिडिओ शेअर; कमेंट करत इंग्लंडचा क्रिकेटर म्हणाला, ‘लवकरच सलमान होशील’

---Advertisement---

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. चहलने पोस्ट केलेले व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. याच दरम्यान चहलने बुधवारी (२३ जून) आपला एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये चहल वर्कआऊट करताना दिसत आहे. चहलच्या या व्हिडिओवर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू साजिद महमूद याने एक जबरदस्त कमेंट केली आहे. या कमेंटला चहलने देखील जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. (The former England cricketer made an interesting comment on the video of the Indian spinner)

युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर जो व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यामध्ये तो खांद्याचा आणि ऍब्सचे वर्कआऊट करताना दिसत आहे

https://www.instagram.com/reel/CQdOOpPHr6v/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडिओवर साजिद महमूदने कमेंट केले की, “लवकरच सलमान खान होशील.” याला चहलने प्रत्युत्तर देत लिहिले की, “आर्नोल्ड श्वार्जनेगर बद्दल काय विचार आहे.” तुम्हाला माहिती असेलच की, आर्नोल्ड हा एक महान बॉडी बिल्डर आहे.

Photo Courtesy: Instagram/yuzi_chahal23

तंदुरुस्तीवर मेहनत घेतोय चहल
युजवेंद्र चहल आपल्या तंदुरुस्तीवर खूप मेहनत घेत आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान चहलच्या आई- वडिलांना देखील कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी चहल पत्नी धनश्री वर्मासोबत वर्कआऊट करताना दिसला होता.

सध्या चहल मुंबईमध्ये भारतीय संघासोबत विलगीकरणात आहे. चहल भारतीय संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ 28 जूनला श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या संघाला श्रीलंका दौऱ्यावर तीन एकदिवसीय मालिका आणि तीन टी-20 मालिका खेळायची आहे. यातील एकदिवसीय मालिकेला १३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली या मालिका खेळणार आहे, तर संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड देखील या दौऱ्यावर जाणार आहे.

युजवेंद्र चहलसाठी श्रीलंका दौरा हा खूप महत्त्वाचा आहे. आयपीएल 2021 मध्ये चहलने काही खास प्रदर्शन केले नव्हते. टी20 विश्वचषक जवळ येत आहे आणि अशामध्ये जर चहलला संघामध्ये स्थान मिळवायचे असेल, तर या दौऱ्यावर त्याला चांगले प्रदर्शन करावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

सचिन ठरला २१ व्या शतकातील सर्वात महान कसोटी फलंदाज; ‘या’ दिग्गजाला मागे टाकत पटकावला मान

कोहलीचं ‘विराट’ मन! कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत असलेल्या वॉटलिंगला भारताच्या कर्णधाराकडून खास शुभेच्छा

…अन् चाहत्यांचे सेलिब्रेशन क्षणात बदलले निराशेत, पाहा कॅमेरामनने टिपलेला भन्नाट व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---