---Advertisement---

टीकटॉक स्टार झालेल्या चहलला टीकटॉक चाहत्यांनीच केले ट्रोल

On: मंगळवार, मे 26, 2020 6:40 PM
---Advertisement---

मागील काही आठवड्यांपासून युट्यूब आणि टीकटॉक चाहत्यांमध्ये कोणता प्लॅटफॉर्म चांगला यावरुन वाद होत आहेत. यावरुन अनेकांची विविध मते आहेत. हा वाद आणखी शिगेला पोहचला जेव्हा कॅरीमिनाटी (CarryMinati) म्हणून ओळखला जाणारा भारताचा आघाडीचा युट्यूबर अजय नागरने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याने टीकटॉकवर टीका केली.

याचदरम्यान आता भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने एक ट्विट करत अजय नागरला पाठिंबा दर्शवल्याने त्याच्यावर टीकटॉक वापरकर्त्यांनी टीका केली आहे. कारण चहल मागील काही दिवसात त्याने केलेल्या टीकटॉक व्हिडिओमुळे बराच चर्चेत होता. त्याने अनेक व्हिडिओ टीकटॉकवर पोस्ट केले आहेत.

पण चहलने सोमवारी ‘Waiting YALGAAR (यालगारची वाट पाहतोय)’ असा ट्विट करत अजय नागरला टॅग केले आहे. त्यामुळे त्याला टीकटॉक चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

Photo Courtesy: Twitter/ yuzi_chahal

अजय नागरचा युट्यूबर कॅरीमिनाटी नावाने चॅनेल आहे. त्यावर अजय नागरने ‘यालगार कमिंग सून’ हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो युट्यूबने त्याचा अलीकडील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर एका आठवड्यात काढून टाकल्यानंतर तो त्याच्या बाजू मांडणार असल्याचे सांगितले आहे. या व्हिडिओनंतर चहलने तो ट्विट केला आहे.

असे केले चहलला ट्रोल – 

https://twitter.com/padlebc/status/1264898672149569538

https://twitter.com/charchitchamp/status/1264887896961454082

https://twitter.com/Rajatkhugshal1/status/1264884173980012544

ट्रेंडिंग घडामोडी – 

८ वर्षांपुर्वीच्या डेक्कन चार्जर्स व सध्याच्या सनराइजर्स हैद्राबादमधील ५ गमतीशीर साम्य

सर्व संघांच्या सपोर्ट स्टाफची मिळून केलेली आयपीएलची अनोखी ‘प्लेइंग इलेव्हन’

…तर गोलंदाजांना मास्क लावून खेळवावे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---