कॅनबेरा। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून (४ डिसेंबर) ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील मनुका ओव्हल स्टेडियमवर पहिला टी२० सामना झाला. मात्र या सामन्यादरम्यान भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्याने भारताला धक्का बसला आहे.
जडेजाच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयने ट्विट करुन माहिती दिली. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार या टी२० सामन्यात भारतीय संघाकडून शेवटच्या षटकात फलंदाजी करत असताना जडेजाच्या हेल्मेटलवर चेंडू लागला. त्यामुळे जडेजाने क्षेत्ररक्षण केले नाही. त्याच्याऐवजी त्याचा कन्कशन सबस्टिट्यूट (दुखापतीमुळे आलेला बदली खेळाडू) म्हणून युजवेंद्र चहल क्षेत्ररक्षणासाठी आला.
जडेजावर सध्या बीसीसीआयचे वैद्यकीय पथक उपचार करत आहे.
UPDATE: Ravindra Jadeja was hit on the helmet in the final over of the first innings of the first T20I.
Yuzvendra Chahal will take the field in the 2nd innings as a concussion substitute. Jadeja is currently being assessed by the BCCI Medical Team. #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/tdzZrHpA1H
— BCCI (@BCCI) December 4, 2020
जडेजाने या सामन्यात ५ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना १६१ धावांचा टप्पा गाठता आला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘खिशातून हात काढा, भारताचा सामना आहे क्लबचा नाही’, युवराज सिंगकडून युवा खेळाडू ट्रोल
विराटच्या घवघवीत यशात मोलाची कामगिरी बजावणारा ‘हा’ व्यक्ती पुन्हा होणार भारतीय संघात सामील
ट्रेंडिंग लेख –
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर