भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. धनश्रीने टाकलेला प्रत्येक व्हिडिओ चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत असते. आता तिने पुन्हा आपला एक नवा व्हिडिओ चाहत्यांच्या भेटीस आणला आहे आणि तो वेगाने व्हायरलही होतो आहे.
धनश्रीने लहंगा घालून केला डान्स
धनश्री वर्माने तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये धनश्री जबरदस्त डान्स करत असून चाहते तिच्या या अंदाजाच्या प्रेमात पडल्याचे दिसत आहे. तिने या व्हिडिओत ‘परम सुंदरी’ हे नवे गाणे वापरले आहे आणि ती यावर डान्स करत आहे. तिचा हा व्हिडिओ चाहतांच्या पसंतीला पडत आहे. ती या गाण्यावर डान्स करतानाचा पूर्ण व्हिडिओ लवकरच शेअर करणार आहे.
https://www.instagram.com/reel/CTzXGk6pAoY/?utm_source=ig_web_button_share_sheet
चहल आणि धनश्रीचा व्हिडिओ व्हायरल
तत्पूर्वी युजवेंद्र चहलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हाडिओ पोस्ट केला होता. त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओत धनश्री आणि त्याच्यामध्ये मजेशीर अंदाजात वाद चालू असल्याचे दिसत होते. या व्हिडिओत दिसते की, पत्नी धनश्री चहलच्या हातात जेवणाची प्लेट देऊन म्हणते, “बटाट्याचे गरमागरम पराठे.” ज्यावर चहल म्हणतो की, “यामध्ये बटाटा कुढे दिसत आहे?” यावर धनश्री उत्तर देते, “कश्मीरी पुलावमध्ये कश्मीर दिसते का तुला.” तसेच “बनारसी साडीमध्ये बनारस दिसते का?” या दोघांचा हा व्हिडिओही प्रचंड व्हायरल झाला होता.
https://www.instagram.com/p/CTY_bZTHoWI/?utm_source=ig_web_button_share_sheet
डिसेंबर २०२० मध्ये झाले आहे चहल आणि धनश्रीचे लग्न
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याच्यी पत्नी धनश्री हे कपल नेहमी चर्चेत असते. ते नेहमीच त्यांच्या चाहत्यांसोबत त्यांचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांनी मागच्याच वर्षी डिसेंबर २०२० मध्ये लग्न केले आहे.
कोण आहे चहलची पत्नी धनश्री?
चहलची पत्नी धनश्री वर्माचा एक डान्सशी संबंधीत यूट्यूब चॅनल आहे. तिच्या चॅनलला १५ लाखांपेक्षा जास्त सब्सक्रायबर्स आहेत. धनश्री बाॅलिवूड गाण्यांना पुन्हा रिक्रियेट करत असते. याव्यतिरिक्त ती हिप हाॅपची ट्रेनिंगही देत असते. तिच्या यूट्यूब चॅनलवर ती तिच्या डान्स अकादमीचे व्हिडिओसुद्धा पोस्ट करत असते. तिने तिचे शिक्षण २०१४ मध्ये डी वाय पाटिल डेंटल काॅलेजमधून पूर्ण केले आहे.