लेगस्पिनर युझवेंद्र चहलने २०११ साली आयपीएल मध्ये पदार्पण केले होते. सुरुवातीला तो मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग होता. मात्र २०१३च्या हंगामानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर अर्थात आरसीबीच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले. तेव्हापासून तो नियमितपणे आरसीबीच्याच संघाचा भाग आहे.
आरसीबीच्या संघाकडून त्याने दमदार प्रदर्शन केले आहे. जवळपास प्रत्येक हंगामात आरसीबीतर्फे सर्वाधिक विकेट्स घेणार्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानांमध्ये असतो. त्यामुळे आरसीबीने देखील त्याला प्रत्येक हंगामात रिटेन करणे, म्हणजेच संघात कायम ठेवणे पसंत केले आहे. मात्र नुकताच त्याला आरसीबी व्यतिरिक्त आयपीएलमध्ये कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर चहलने आयपीएलच्या लोकप्रिय संघाचे नाव घेतले.
‘या’ संघाकडून खेळण्याची इच्छा
युझवेंद्र चहलला नुकतेच एका मुलाखतीत आरसीबी व्यतिरिक्त आयपीएल मधील कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देतांना त्याने एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून खेळायला आवडेल असे उत्तर दिले. भारतीय संघाकडून खेळतांना देखील धोनीच्या यष्टीमागील मार्गदर्शनाने चहलच्या कामगिरीत मदत होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आयपीएल मध्ये देखील सहाजिकच त्याने धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र आगामी काळात आरसीबी संघ त्याला रिलीज करण्याची चिन्हे कमी आहेत. त्यामुळे चहलची ही इच्छा अपूर्णच राहू शकते.
यंदाच्या हंगामात चहल ‘फ्लॉप’
गेल्या अनेक वर्षांपासून चहल आरसीबी साठी सातत्यपूर्ण कामगिरी करत असला तरी यंदाच्या आयपीएल हंगामात त्याला खास कामगिरी करता आली नाही. यंदाच्या हंगामात त्याने ७ सामने खेळतांना ८.२६च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. आणि या दरम्यान केवळ ४ विकेट्स घेण्यात त्याला यश आले. हा आयपीएल हंगाम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. उर्वरित आयपीएल हंगाम आता येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यावेळी चहल आपला फॉर्म परत मिळवेल आणि आरसीबीला विजेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, अशी त्यांच्या चाहत्यांना आशा असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई प्रशिक्षक निवडीचा वाद पोहोचला कोर्टात, माजी अध्यक्षांनी दाखल केली याचिका
विरोधी संघावर ‘त्याचा’ प्रभाव असा पडतो, जसा पुर्वी सेहवाग-गिलख्रिस्टचा असायचा; कार्तिकचे भाष्य
भारतीय क्रिकेटप्रेमींना धक्का! टी२० विश्वचषक गेला भारताबाहेर? युएईसह ‘या’ देशात होणार आयोजन







3 माफीनामे आणि मेस्सीसाठी खास मॅसेज! 24 तासांमध्ये रोनाल्डोची दुसरी बाजू समोर