भारतीय संघाचा धडाकेबाज खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सध्या संघाबाहेर आहे. अष्टपैलू हार्दिक सध्या दुखापतीमुळे संघर्ष करताना दिसत आहे. इतकंच नाही, तर आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सनेही हार्दिकला संघात कायम ठेवले नाही. या स्थितीत पाहता हार्दिकचे भवितव्य अंधारात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नाला माजी डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खानने उत्तर दिले.
झहीर म्हणतो की, मुंबई इंडियन्समध्ये कायम ठेवण्याचा मुद्दा अनेक पैलूंवर अवलंबून आहे. हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्ससाठी (IPL 2022) कठीण काळात महत्त्वपूर्ण धावा केल्या आहेत. मुंबई पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनली, त्यात हार्दिकने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र 2019 मध्ये झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तो कधीच पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकला नाही.
टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना मुंबई इंडियन्सचा क्रिकेट संचालक असलेला झहीर खान म्हणाला, “निश्चितपणे हार्दिक पूर्ण फिटनेस मिळवू शकतो. राइट ऑफ करण्यापूर्वी फ्रँचायझीला अनेक पैलू पहावे लागतात. या विषयावरील चर्चा सहसा खूप लांब असते. ज्या क्रिकेटपटूंसोबत तुम्ही एवढा वेळ संघात घालवला त्यांना मेगा-लिलावापूर्वी अशा प्रकारे सोडणे इतके सोपे नाही. मोठ्या लिलावासाठी आम्हाला स्वतःला तयार करावे लागेल.”
कर्णधार रोहित शर्मा व्यतिरिक्त मुंबई इंडियन्सने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, फलंदाज सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू कायरन पोलार्ड यांना कायम ठेवले आहे.
अधिक वाचा – Video: पप्पा हार्दिकला सोबतीला घेत अगस्त्यची जबरदस्त फलंदाजी, काका कृणालनेही गोलंदाजी करत दिली साथ
हार्दिकने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 92 सामने खेळले असून यामध्ये त्याने १४७६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ४ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 42 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने हे सर्व सामने मुंबई इंडियन्सकडूनच खेळले आहेत. पण, आता मुंबईने त्याला संघाबाहेर केले असल्याने आयपीएलच्या 15 व्या हंगामात हार्दिक कोणत्या संघातून खेळतो हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चांगल्या कामगिरीसाठी कसं केलं शार्दुलला तयार, प्रशिक्षक दिनेश लाड यांचा खुलासा
आधी खांद्यावरची धूळ झटकली, मग थेट अंगावर गेला; बुमराह-जेन्सनचे भर मैदानात कडाक्याचे भांडण
व्हिडिओ पाहा – संघाला कठीण परिस्थितीतून सावरणारे ५ गोलंदाज