दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सध्या ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ७ विकेट्स घेतले. तसेच त्याने फलंदाजी करताना दुसऱ्या डावात २८ धावांची छोटेखानी खेळी केली. त्याच्या या कामगिरीचे कौतुक होत असतानात त्याचे गुरू दिनेश लाड यांनी त्याच्या मेहनतीबद्दल भाष्य केले आहे.
शार्दुल ठाकूरचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी सांगितले की, त्यांनी या शिष्यासह केवळ मानसिक कणखरतेवर काम केले. याशिवाय आपण काहीही केले नाही, असे ते म्हणाले. शार्दुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ६१ धावांत सात बळी घेतले.
‘लॉर्ड शार्दुल’ किंवा ‘पालघर एक्सप्रेस’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ठाकूरने कारकिर्दीचे सुरुवातीचे दिवस लाड यांच्यासोबत मुंबईत घालवले आहेत.
लाड म्हणाले, ‘मी त्याच्यासोबत विशेष काही केले नाही, पण त्याच्या मानसिकतेवर काम केले. मला आठवतंय, जेव्हा त्याला आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले नाही, तेव्हा तो खूप निराश व्हायचा आणि म्हणायचा की ते मला अजिबात खेळू देत नाही.
ते म्हणाले, ‘मी त्याला म्हणायचो की, काही फरक पडत नाही. तूझी निवड झाली आहे आणि मोठ्या खेळाडूंसोबत सराव करणे तूझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
अधिक वाचा – ‘ये तो होना ही था!’ जोहान्सबर्ग कसोटीत ७ विकेट घेताच शार्दुल ठाकूरचे मीम व्हायरल
३० वर्षीय ठाकूरने ऑक्टोबर 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली कसोटी खेळली होती, पण पुढच्या कसोटीसाठी त्यांना बराच काळ वाट पाहावी लागली.
भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्माचे देखील प्रशिक्षक असलेले लाड यांनी ठाकूरला फक्त एकच सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, “जेव्हा त्याची पहिल्यांदा वेस्ट इंडिज दौऱ्यावर निवड झाली, तेव्हा मी त्याला एवढेच सांगितले की, काही वेगळे करू नकोस. रणजी ट्रॉफीमध्ये जशी गोलंदाजी केली, तशीच कर. तो शिकत राहिला. मी त्याला फलंदाजाला खेळण्यास भाग पाडण्यास सांगितले जेणेकरुन विकेट घेण्याच्या संधी असतील. त्याने आपल्या फलंदाजीवरही मेहनत घेतली.”
महत्त्वाच्या बातम्या –
आधी खांद्यावरची धूळ झटकली, मग थेट अंगावर गेला; बुमराह-यान्सिनचे भर मैदानात कडाक्याचे भांडण
आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहचा टॉप १० मध्ये प्रवेश, तर कर्णधार कोहलीची मोठी घसरण
Video: जेव्हा बुमराहने अश्विनच्या गोलंदाजी ऍक्शनची केली नक्कल, फिरकीपटूही पाहून झाला लोटपोट