दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कटक येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाचा ४ विकेट्सने पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १४८ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभी केली होती. प्रत्युत्तरात आव्हानाचा बचाव करताना भारतीय संघाला चांगली सुरुवातही मिळाली होती. तरीही मधल्या षटकातील खराब गोलंदाजीमुळे व दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा आणि हेन्रिच क्लासेन यांच्या चिवट खेळीमुळे भारतीय संघाच्या हातून सामना निसटला. यानंतर माजी भारतीय गोलंदाज झहीर खान याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षक (Indian Team Coach) राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी खेळाडूंशी कडव्या शब्दात बोलण्याची गरज आहे. तसेच भारतीय संघात लढाऊ वृत्तीची कमी (Team Spirit) दिसत असल्याचेही झहीरने (Zaheer Khan) म्हटले आहे.
भारतीय संघाच्या १४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग बचाव करताना पावरप्लेमध्ये भारतीय संघाने ३ विकेट्स घेत चांगली सुरुवात केली होती. परंतु पुढे क्लासेन आणि कर्णधार बावुमाने मिळून ४१ चेंडूत ६४ धावा बनवल्या. परिणामी दक्षिण आफ्रिकेने १८.२ षटकात सामनाही जिंकला आणि २-० ने मालिकेत आघाडीही घेतली.
यानंतर झहीरने भारतीय खेळाडूंचे कान टोचत म्हटले आहे की, “जेव्हा क्लासेन आणि बावूमामध्ये भागीदारी होत होती, तेव्हा सामना पाहणाऱ्या प्रत्येकाला जाणवत होते की, भारतीय संघ सामन्यात पिछाडीवर पडत आहे. मैदानावर स्पष्टपणे हे दिसत होते. या अशा गोष्टी आहेत, ज्यांवर राहुल द्रविड आणि त्यांच्या संघाने लक्ष देणे गरजेचे आहे. या गोष्टी जितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर सुधारणा करण्याची गरज आहे. कारण तिसरा टी२० सामना लगेचच एका दिवसानंतर आहे. त्यांना एकत्र यावे लागेल, काही मुद्द्यांवर चर्चा करावी लागेल आणि या गोष्टीवर लक्ष द्यावे लागेल की, ४० षटकांच्या या सामन्यात लढण्यासाठी काय करावे लागेल?”
“फक्त दुसऱ्या टी२० सामन्यातच नव्हे तर, पहिल्या सामन्यातही असे वाटत होते की, भारतीय संघ पुढे आहे. दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघ पुढे दिसत होता. गोलंदाजीतही भारतीय संघाला आदर्श सुरुवात मिळाली होती. भुवनेश्वर कुमारने खूपच कमालीची गोलंदाजी केली होती. परंतु तो त्याप्रकारे सामना संपवू शकला नाही. ही मालिका जसजशी पुढे जात आहे, तशतशा भारतीय संघासाठी काही काळजी वाढवणाऱ्या गोष्टी पुढे येत आहे. तसेच त्यांच्यावरील दबावही वाढत आहे,” असेही झहीरने म्हटले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अगग! पाकिस्तानचे फलंदाज विंडीजच्या ‘कामचलाऊ’ गोलंदाज पूरणपुढे नतमस्तक, एक-दोन नव्हे चौघे तंबूत
धक्कादायक! पुण्यातील २२ वर्षीय तरुणाचा क्रिकेट खेळताना दम लागून आकस्मिक मृत्यू
भारताला हरवण्यासाठी दक्षिण आफ्रिकी कर्णधाराने खेळला गेम, ‘या’ घातक खेळाडूचा केला वापर