---Advertisement---

टी२० विश्वचषकासाठी झहीर खानने निवडला १५ सदस्यीय भारतीय संघ, बघा कोण इन कोण आऊट

On: शुक्रवार, जुलै 30, 2021 3:19 PM
---Advertisement---

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा प्रारंभ व्हायला अवघे ३ महिने शिल्लक राहिले आहेत. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पाडलेली टी-२० मालिका ही टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वीची शेवटची मालिका होती. यानंतर आता हे खेळाडू सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहेत. ही स्पर्धा संपल्यानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. अशातच माजी भारतीय गोलंदाज जहीर खानने टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय खेळाडूंची निवड केली आहे. त्यांनी आपल्या या संघात कोणत्या खेळाडूंना स्थान आहे? चला पाहूया. (Zaheer Khan named 15 memeber indian squad for upcoming icc T20 world cup)

जहीर खानने क्रीकबजवर बोलताना म्हटले की, “मी डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी केएल राहुल आणि रोहित शर्मा यांना देतो. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव त्यानंतर फलंदाजीला येतील. मला ठाऊक आहे की, विराटने तो टी२० विश्वचषकात सलामीला फलंदाजी करेल असे म्हटले होते. परंतु माझ्या मते विराटने तेव्हाच डावाची सुरुवात करावी जेव्हा हार्दिक पंड्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळत असेल. त्यामुळे तुम्ही एक अतिरिक्त गोलंदाजाला खेळवु शकता आणि एका फलंदाजाला बाहेर बसवू शकता.”

जहीर खानच्या मते सूर्यकुमार यादवला टी-२० विश्वाचषक स्पर्धेत स्थान दिले गेले पाहिजे. तर त्याने शिखर धवनला या संघात स्थान दिले नाही. त्याच्या मते धवनने श्रीलंका दौऱ्यावर साजेशी कामगिरी केली नाही.

जहीरच्या मते, फिरकी गोलंदाज म्हणून युजवेंद्र चहालला संधी दिली गेली पाहिजे. तर वरून चक्रवर्ती किंवा वॉशिंग्टन सुंदर बॅकअप गोलंदाजाची भूमिका पार पाडू शकतात. तर रवींद्र जडेजा ऑफ स्पिन गोलंदाजाची भूमिका पार पाडू शकतो. जहीरने याबद्दल म्हटले की, “मी चहलला मुख्य गोलंदाज म्हणून संघात स्थान देईल. तर राहुल चाहर बॅकअप गोलंदाजाची भूमिका पार पाडू शकतो. टी -२० फॉरमॅटमध्ये लेग स्पिनर महत्वाची भूमिका बजावतात. तसेच वरून चक्रवर्ती किंवा वॉशिंग्टन सुंदर या गोलंदाजांना मिस्ट्री गोलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात येऊ शकते. हे नवीन चेंडूने डावाची सुरुवात करून देऊ शकतात.”

तसेच जहीर खानने आपल्या संघात वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांना स्थान दिले आहे. तर टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमार या दोघांपैकी एका गोलंदाजाला या संघात स्थान दिले जाऊ शकते, असेही त्याचे म्हणणे आहे.

असा आहे जहीर खानने टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेला १५ सदस्यांचा संघ
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन,रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, दीपक चाहर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, राहुल चाहर, टी नटराजन/भुवनेश्वर कुमार, वॉशिंगटन सुंदर/वरुण चक्रवर्ती.

महत्त्वाच्या बातम्या-

गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही पुढे! श्रीलंकेच्या ओपनरविरुद्ध योजनात्मक चेंडू टाकत चाहरने स्वत:च टिपला अप्रतिम झेल

अजिंक्य रहाणेचे खराब प्रदर्शन ‘या’ २ फलंदाजांसाठी खुले करू शकते कसोटी संघाचे दरवाजे

बायो बबल तोडणं आलं अंगाशी; श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूंवर २ वर्षांची बंदी, तर एकटा दीड वर्षासाठी निलंबीत?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---