रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला सोमवारी (दि. 17 एप्रिल) घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्स संघाकडून पराभवाचा धक्का बसला. आयपीएल 2023 स्पर्धेच्या 24 व्या सामन्यात चेन्नईने बेंगलोरचा 8 धावांनी नजीकचा पराभव केला. 227 धावांचा पाठलाग करताना आरसीबी हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र, चेन्नईच्या गोलंदाजांनी अखेरच्या टप्प्यात उत्कृष्ट मारा करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात आरसीबी संघ कोठे कमजोर पडला याविषयी भारताचा माजी वेगवान गोलंदाज व मुंबई इंडियन्स संघाच्या सपोर्ट स्टाफपैकी एक असलेल्या झहीर खान याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघाने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 226 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोर संघाला 218 धावाच करता आल्या. यावेळी फाफ डू प्लेसिस (62) आणि ग्लेन मॅक्सवेल (76) यांनी वादळी फलंदाजी केली. मात्र, हे दोघे लागोपाठच्या षटकात बाद झाल्याने आरसीबीच्या विजयाच्या आशा कमी झालेल्या. दिनेश कार्तिक व सुयश प्रभुदेसाई यांनी थोडेफार प्रयत्न केले मात्र ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
आरसीबीच्या या पराभवानंतर बोलताना झहीर खान म्हणाला,
“विराट बाद झाल्यानंतर ज्या दबावातून प्लेसिस व मॅक्सवेलने फलंदाजी केली, त्यामुळे सामना रंगतदार बनला. एक वेळ ते सामना जिंकण्याच्या जवळ होते. मात्र, संघासाठी दिनेश कार्तिक यापूर्वी जसे योगदान दिले आहेत तसे ते देऊ शकला नाही तर, या अडचणी तशाच राहतील. कारण, तो संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याला जबाबदारी घ्यावी लागेल.”
कार्तिक याने 14 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 28 धावा कुटल्या. असे असले, तरीही तो शेवटपर्यंत टिकून सामना संपवू शकला नाही. त्यामुळे हा सामना बेंगलोरला गमवावा लागला. पाच सामन्यातील बेंगलोरचा हा तिसरा पराभव आहे.
(Zaheer Khan Slam Dinesh Karthik For RCB Defeat Against CSK)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नो-बॉलचा मारा करताच पंचांनी हर्षलला गोलंदाजी करण्यापासून का रोखले? ‘हे’ आहे कारण
आयपीएल 2023मधून मोठी बातमी! LSG vs CSK सामन्याच्या वेळापत्रकात बदल; जाणून घ्या कारण