इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील दुसरा सामना बेसिन रिझर्व्हच्या मैदानावर रंगला आहे. दरम्यान ‘झॅक क्रॉली’ने (Zak Crawley) असा रेकाॅर्ड केला, जो जवळपास 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला. क्रिकेट इतिहासातील पहिली अधिकृत कसोटी 1877 मध्ये खेळली गेली. आता 2024 पर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये फक्त दुसऱ्यांदा असा रेकाॅर्ड झॅक क्रॉलीने केला आहे. याआधी वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) असा रेकाॅर्ड करण्यात यशस्वी झाला होता.
वास्तविक, झॅक क्रॉली (Zak Crawley) हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कसोटीच्या पहिल्याच षटकात षटकार ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीच्या (Tim Southee) शेवटच्या चेंडूवर क्रॉलीने षटकार ठोकला होता. याआधी ख्रिस गेलने 2012 मध्ये बांगलादेशविरूद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीत पहिल्याच षटकात षटकार ठोकला होता. गेलने पहिल्याच षटकात 2 षटकार मारले होते. पहिल्या चेंडूवर षटकार मारून त्याने कसोटीची सुरूवात केली. आता या यादीत स्थान मिळवणारा क्रॉली जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.
न्यूझीलंडविरूद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात इंग्लंडचा झॅक क्रॉली फ्लॉप ठरला. पहिल्या डावात त्याने 23 चेंडूत 1 चौकार, 1 षटकाराच्या मदतीने केवळ 17 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात क्रॉलीला दुहेरी आकडाही पार करता आला नाही. दुसऱ्या डावात क्रॉलीने 7 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने केवळ 8 धावा केल्या.
झॅक क्राॅलीने (Zak Crawley) 51 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 31.29च्या सरासरीने फलंदाजी करताना 2,848 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 65.47 राहिला आहे. कसोटीमध्ये त्याने 16 अर्धशतकांसह 4 शतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
SA VS SL; अँजेलो मॅथ्यूजचा मोठा विक्रम, श्रीलंकेसाठी अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा फलंदाज
IND VS AUS; वॉशिंग्टनऐवजी अश्विनला संधी का मिळाली, सहाय्यक प्रशिक्षकानं सांगितली आतली गोष्ट
Under 19 Asia Cup: फायनलमध्ये भारत बांग्लादेश आमने-सामने, या दिवशी रंगणार महामुकाबला