नागपुर। नागपुर जिल्हा टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित आर्यन पम्प्स एमएसएलटीए 15000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पात्रता फेरीच्या अंतिम चरणात स्मृती भसीन, निधित्रा राजमोहन, शर्मदा बाळू या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
नागपूर येथील एमएसएलटीए टेनिस कोर्टवर सुरू झालेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत पंधराव्या मानांकित भारताच्या कशिश भाटियाने यूएसएच्या चौथ्या मानांकित श्रीया अत्तारूचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करून आगेकूच केली.भारताच्या नवव्या मानांकित निधित्रा राजमोहन हिने इटलीच्या सहाव्या मानांकित लरिया स्पोसेत्तीचा 7-5, 6-2 असा तर, दहाव्या मानांकित शर्मदा बाळूने सातव्या मानांकित प्रतिभा नारायणप्रसादचा 6-1, 6-3 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. बिगरमानांकित वंशिता पठानिया हिने तेराव्या मानांकित साई देदीप्प्या येद्दुलाचा 2-6, 6-2[10-3] असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला.
स्पर्धेत रशिया, जर्मनी, थायलंड, डेन्मार्क, अमेरिका, इटली, ऑस्ट्रिया या 7 देशांतून अव्वल टेनिसपटूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.
निकाल: अंतिम पात्रता फेरी: महिला गट:
अविष्का गुप्ता(भारत) [11] वि.वि.प्रियांका रॉड्रिक्स(भारत)6-2, 6-3;
श्रेया तातावर्थी(भारत)[2] वि.वि.पवनी पाठक(भारत)6-1, 6-1;
स्मृती भसीन(भारत) [8] वि.वि.लालित्य कल्लूरी(भारत)6-2 6-7(8) [12-10]
वंशिता पठानिया(भारत)वि.वि.साई देदीप्प्या येद्दुला(भारत) [13] 2-6, 6-2[10-3];
जगमीत कौर ग्रेवाल(भारत)वि.वि.अंजली राठी(भारत) [14]7-6(3), 2-6, [11-9];
कशिश भाटिया(भारत)[15] वि.वि.श्रीया अत्तारू(यूएसए) [4] 6-2, 6-2;
निधित्रा राजमोहन(भारत) [9] वि.वि.इलरिया स्पोसेत्ती(इटली)[6] 7-5, 6-2;
शर्मदा बाळू(भारत)[10]वि.वि.प्रतिभा नारायणप्रसाद(भारत)[7] 6-1, 6-3;
खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
1.झील देसाई(भारत), 2.एना उरके(रशिया), 3.एमिली सेबोल्ड(जर्मनी), 4.पी कोवापिटुटेड(थायलँड), 5.वैदेही चौधरी(भारत), 6.जेनिफर लुईखेम(भारत), 7.समा सात्विका(भारत), 8.मिहिका यादव(भारत).
महत्त्वाच्या बातम्या –
पीवायसीच्या वतीने स्नूकरसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित
विराटला १०० व्या कसोटीसाठी काय भेट देणार? बुमराहने दिले ‘हे’ उत्तर
आयएसएल: जमशेदपूरचा डबल धमाका; प्ले-ऑफ फेरीवर शिक्कामोर्तब