भारतीय पुरूष क्रिकेट संघ झिम्बाब्वेच्या (ZIMvsIND) दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना गुरूवारी (१८ ऑगस्ट) हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे खेळला जाणार आहे. मालिका सुरू होण्याआधीच भारताचे काही खेळाडू भलतेच आनंदात दिसले आहेत. या दौऱ्यात भारतीय संघाचा उपकर्णधार शिखर धवनने डान्स करतानाचा व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये इशान किशन आणि शुबमन गिलही दिसत आहे. तर या त्रिकुटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
शिखर धवन (Shikhar Dhawan) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. जो चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. या व्हिडिओमध्ये इशान किशन (Ishan Kishan) हा मध्ये तर धवन आणि शुबमन गिल (Shubman Gill) त्याच्या आजूबाजूला उभे आहेत. या तिघांनीही काळा चष्मा लावत पंजाबी गाण्यावर डान्स केला आहे. या व्हिडिओला धवनने ‘हां जी बिब्बा किद्दा?’ असे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
धवन, गिल आणि किशन यांच्या या भन्नाट डान्सला काही भारतीय खेेळाडूंनीही तेवढ्याच जबरदस्त प्रतिक्रीया दिल्या आहेत.
भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यात केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहेत. या दौऱ्यात भारताचे अनेक मुख्य खेळाडू अनुपस्थित आहेत. जेव्हा या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली तेव्हा धवनला कर्णधार केले होते. मात्र राहुल संघात परतल्याने त्याला संघाचा कर्णधारपद सोपविले. राहुलने फिटनेसची चाचणी पार केल्यानंतरच त्याला संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देऊ केली.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ-
भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुनरागमनासाठी सुकांत सज्ज! पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे हेच मुख्य उद्दिष्ट
सचिनचा ‘जिगरी दोस्त’ काढतोय पेन्शनवर दिवस! नोकरी आणि सचिनबद्दल विचारताच म्हणाला, “त्याने तर…”
विंडीजच्या ‘या’ खेळाडूने संघासाठी एक नव्हे तर दोन विश्वचषक जिंकण्याची इच्छा केली व्यक्त