---Advertisement---

एक शतक अन् आयसीसी क्रमवारीत गिलला थेट ४५ स्थानांचा फायदा! वाचा सध्या कोणत्या स्थानावर विराजमान

On: बुधवार, ऑगस्ट 24, 2022 5:10 PM
Shubman-Gill
---Advertisement---

झिम्बाब्वेच्या दौऱ्यात भारतीय संघाने (ZIMvsIND) चमकदार कामगिरी केली आहे. भारताने केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळताना यजमान संघाला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-० असा क्लीन स्विप दिला आहे. या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी शतकी खेळी केली. त्यातील शुबमन गिलचे हे क्रिकेट कारकिर्दीतील पहिले तर सिकंदर रझाचे सहावे वनडे शतक ठरले आहे. या दोघांनाही त्यांच्या या कामगिरीचा मोठा फायदा झाला आहे. दोघांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) याने लागोपाठ दोन वनडे मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. यामुळे तो दोन्ही वेळा मालिकावीराचा मानकरी ठरला आहे. तर आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीत त्याला सर्वाधिक स्थानांचा फायदा झाला आहे. त्याला ४५ स्थानांचा लाभ झाला आहे. यामुळे आता तो ९३ स्थानांवरून थेट ३८व्या स्थानावर पोहोचला आहे. तर झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (Sikandar Raza) यालाही ७ स्थानांचा फायदा झाला आहे. त्याने आता २५वे स्थान गाठले आहे. वनडे गोलंदाजीत पाहिले तर भारताकडून पहिल्या दहामध्ये जसप्रीत बुमराह आहे. तो चौथ्या स्थानावर आहे.

आयसीसी वनडे क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम (Babar Azam) अव्वल स्थानावर कायम आहे. मात्र इमाम उल हकला दोन स्थानांचे नुकसान झाले असून तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच झिम्बाब्वे दौऱ्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे खेळले नसले तरी त्यांचे अनुक्रमे पाचवे आणि सहावे स्थान कायम आहे. त्याचबरोबर भारताचा सलामीवीर शिखर धवन १२व्या स्थानावर आहे.

ताज्या आयसीसी क्रमावरीत कसोटीमध्येही बदल झाला आहे. नुकतेच इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी सामना झाला. त्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा कगिसो रबाडा याला २ स्थानांचा फायदा झाला असून तो आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच एनरिच नोर्तजे याने देखील १४ स्थानांनी उडी घेत २५वे स्थान गाठले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान महामुकाबल्यात ‘या’ पाच जणांत रंगणार ‘बॅटिंग बॅटल’
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ब्रेट ली म्हणतोय, ‘मला रिषभ पंतला गोलंदाजी करायचीये!’
फलंदाजांना सळो की पळो करून सोडायला एशियातील सर्वोत्तम ५ गोलंदाज सज्ज, वाचा संपूर्ण यादी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---