ऑस्ट्रेलियात सुरू झालेल्या टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2022) दुसऱ्या दिवशी झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. सुरुवातीला संकटात सापडलेल्या झिम्बाब्वेने नंतर शानदार खेळ करत आयर्लंडला 31 धावांनी पराभूत करत विजयी सुरुवात केली. झिम्बाब्वेचा अष्टपैलू सिकंदर रझा (Sikandar Raza) सामन्याचा मानकरी ठरला.
A solid performance from Zimbabwe ????
They start off their campaign with a win against Ireland in the Group B fixture ????????#ZIMvIRE | #T20WorldCup | ???? https://t.co/AzCNiptOur pic.twitter.com/UyrdR6wsO9
— ICC (@ICC) October 17, 2022
होबार्ट येथे झालेल्या या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय सुरुवातीला योग्य ठरला. झिम्बाब्वे संघाचे पहिले तीन फलंदाज केवळ 37 धावांवर माघारी परतले. मागील काही काळापासून झिम्बाब्वे संघाचा प्रमुख खेळाडू बनलेला अष्टपैलू सिकंदर रझाने पुन्हा एकदा संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने पाच चौकार व पाच षटकारांच्या मदतीने 48 चेंडूवर 82 धावांची खेळी केली. जॉंगवेने 10 चेंडूंवर 20 धावा करत संघाला 7 बाद 174 धावांपर्यंत मजल मारून दिली. आयर्लंडसाठी जोशुआ लिटल याने तीन तर, अडायर व सिमी सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचे पहिले चार फलंदाज केवळ 22 धावांवर माघारी परतले. त्यानंतर कर्टीस कॅम्पर (27), जॉर्ज डॉकरेल व गॅरेथ डेलानी यांनी प्रत्येकी 24 धावा करत संघाला सामन्यात कायम ठेवले. अखेरीस बॅरी मॅकार्थीने नाबाद 22 धावा केल्या. मात्र, त्यानंतरही आयर्लंडला 31 धावांनी पराभव पत्करावा लागला. 82 धावांची खेळी तसेच 1 एक बळी मिळवणारा सिकंदर रझा सामनावीर ठरला.
दिवसातील पहिल्या सामन्यात स्कॉटलंडने मोठा उलटफेर करत दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे या गटातून कोणते दोन संघ पुढच्या फेरीत मजल मारणार याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.






