गुरुवारी (१८ ऑगस्ट) झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात १० विकेट्सने विजय मिळवत भारतीय संघाने मालिकेची दमदार सुरुवात केली आहे. हरारे येथे झालेला हा सामना जिंकत पाहुण्या भारतीय संघाने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. झिम्बाब्वे संघासाठी भारताविरुद्धच्या मालिकेचे महत्त्व खूप जास्त आहे. कारण या मालिकेत यजमानपद भूषवल्याने झिम्बाब्वे संघाला आर्थिकदृष्ट्या खूप फायदा होणार आहे.
झिम्बाब्वे क्रिकेटचे (Zimbabwe Cricket Board) अध्यक्ष तवेंगवा मुकुहलानी यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, हरारे येथे सुरू असलेल्या वनडे मालिकेमुळे झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला ३ मिलियन डॉलर्सच्या (भारतीय चलनानुसार २४ कोटी) आसपास कमाई होण्याची आशा आहे. झिम्बाब्वेच्या चलनानुसार पाहायचे झाल्यास, ३ मिलियन डॉलर्सची किंमत जवळपास ९६ कोटी रुपये (96 Crore) होते.
झिम्बाब्वेची आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे. याचा परिणाम झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डावरही पडत आहे. अशात भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याने बोर्डाला आर्थिकदृष्ट्या किती फायदा होईल याबद्दल सांगताना मुकुलहानी म्हणाले की, “ही वनडे मालिका असल्याने आम्हाला ३ मिलियन अमेरिकी डॉलरच्या जवळपास कमाईची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त आम्हाला अपेक्षा आहे की, सर्व सामन्यांमध्ये मैदान दर्शकांनी भरलेले असेल. या हिशोबाने हा दौरा आमच्यासाठी फायदेशीर राहिल.”
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी वेळापत्रक
दरम्यान भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघातील ३ सामन्यांची वनडे मालिका १८ ऑगस्ट रोजी सुरु झाली आहे. तर मालिकेतील दुसरा सामना २० ऑगस्टला आणि तिसरा सामना २२ ऑगस्टला खेळला जाईल. हे तिन्ही सामने हरारेरीत हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळले जातील. तसेच भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२.४५ वाजता या सामन्यांना सुरुवात होईल.
झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल , आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाज अहमद.
(दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीत झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष तवेंगवा मुकुहलानी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे)
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
धडाकेबाज पुनरागमनानंतर चाहरसाठी टी२० विश्वचषकाची दारे खुली? गोलंदाज म्हणतोय, ‘माझी निवड…’
राष्ट्रगीत सुरू असताना भर मैदानात इशान किशनवर ‘हल्ला’! खूप घाबरला भारतीय क्रिकेटर
आजच्याच दिवशी २२ वर्षांपूर्वी रंगलेला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान सामना






