झिम्बाब्वे क्रिकेटने नुकतेच संघाचा भाग असलेले वेस्ली माधवेरे आणि ब्रँडन मावुता यांना तात्काळ निलंबित केले आहे. या दोघांवर कथित डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे आणि सुनावणी होईपर्यंत ते क्रिकेटशी संबंधित कोणत्याही प्रकारामध्ये भाग घेऊ शकणार नाहीत.
झिम्बाब्वे क्रिकेट आचारसंहितेअंतर्गत वेस्ली माधवेरे ( Wesley Madhavere) आणि ब्रॅंडन मावुता (Brandon Mavuta) यांच्यावर खेळाडू आणि संघ अधिकारी यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. हे दोघेही लवकरच शिस्तभंगाच्या सुनावणीसाठी हजर होतील, ज्यामुळे त्यांच्या निलंबनाचा निर्णय निश्चित होईल.
अलीकडेच झिम्बाब्वेने आयर्लंडचे घरच्या मैदानावर यजमानपद भिषविले आणि त्यांच्याविरुद्ध टी20 आणि एकदिवसीय सामने खेळले. वेस्ली माधवेरेने टी20 मालिकेतील तिन्ही सामने खेळले, तर ब्रँडन मावुताने शेवटचे टी20 आणि मालिकेतील तीनही एकदिवसीय सामने खेळले. माधेवरेने तीन सामन्यांत फलंदाजी करत 48 धावा केल्या होत्या, पण गोलंदाजीत त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्याचवेळी मावुताने खेळल्या सामन्यांमध्ये 44 धावा केल्या होत्या आणि गोलंदाजीत चार विकेट्स घेतल्या होत्या.
ब्रँडन मावुताने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि त्याने आतापर्यंत चार कसोटी, 12 एकदिवसीय आणि 10 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, तर 2020 मध्ये झिम्बाब्वेकडून पदार्पण करणाऱ्या वेस्ली माधवेरेने दोन कसोटी, 36 एकदिवसीय सामने आणि 60 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
आयर्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर मावुताने एकही सामना खेळला नाही. त्यानंतर माधवेरे झिम्बाब्वेच्या लोगान कप प्रथम श्रेणी स्पर्धेत मॅशोनालँड ईगल्सकडून खेळला, त्याने 4 धावा केल्या आणि गोलंदाजीत 34 धावांत 2 विकेट्स घेतल्या.
झिम्बाब्वे संघाचे मुख्य प्रशिक्षक डेव्ह हॉटन (Dave Houghton) यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि खेळाडू आता त्यांचं ऐकत नसल्याचा खुलासा त्यांनी केला होता. झिम्बाब्वेने गेल्या काही काळापासून सातत्याने खराब कामगिरी केली आहे आणि संघ 2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता देखील गमावला आहे. (Zimbabwe Cricket has suspended two of its players the big reason has come to light)
हेही वाचा
‘मला कसलाही पश्चाताप नाही, उलट…’, 24.75 कोटींची बोली लागलेल्या स्टार्कचे 8 IPL हंगाम न खेळण्याविषयी भाष्य
Breaking: IPL लिलावात RCBमध्ये सामील झालेल्या स्टार खेळाडूवर 4 सामन्यांची बंदी, टी20 लीगमध्ये केली मोठी चूक