---Advertisement---

कौतुक करावे तितके कमीच! झिम्बाब्वे बोर्डाने भारताविरुद्धची दुसरी वनडे ‘या’ लोकांना केलीय समर्पित

On: शनिवार, ऑगस्ट 20, 2022 11:57 AM
zimbabwe-team
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पार पडला असून पाहुण्या भारतीय संघाने १० विकेट्सने हा सामान जिंकला. यासह भारतीय संघ वनडे मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. आता झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघातील दुसरा सामना शनिवारी (२० ऑगस्ट) दुपारी १२.४५ वाजता होणार आहे. तत्पूर्वी यजमान झिम्बाब्वे क्रिकेट संघाने मोठा निर्णय घेत कोट्यवधी मने जिंकली आहेत. 

झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धचा दुसरा वनडे सामना झिम्बाब्वेतील कँसरग्रस्त रुग्णांना समर्पित करणार आहे. या चांगल्या कामात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दर्शकांना केशरी रंगाची जर्सी घालून सामना पाहायला येण्याचे आव्हानही बोर्डाने केले आहे. झिम्बाब्वे बोर्डाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

भारताच्या दौऱ्यातून झिम्बाब्वे करणार कोट्यवधी

दरम्यान भारताच्या दौऱ्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला आर्थिकदृष्ट्या भरपूर मदत होणार आहे. झिम्बाब्वे क्रिकेटचे (Zimbabwe Cricket Board) अध्यक्ष तवेंगवा मुकुहलानी यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, हरारे येथे सुरू असलेल्या वनडे मालिकेमुळे झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला ३ मिलियन डॉलर्सच्या (भारतीय चलनानुसार २४ कोटी) आसपास कमाई होण्याची आशा आहे. झिम्बाब्वेच्या चलनानुसार पाहायचे झाल्यास, ३ मिलियन डॉलर्सची किंमत जवळपास ९६ कोटी रुपये (96 Crore) होते.

झिम्बाब्वेची आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे. याचा परिणाम झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डावरही पडत आहे. अशात भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याने बोर्डाला आर्थिकदृष्ट्या किती फायदा होईल याबद्दल सांगताना मुकुलहानी म्हणाले की, “ही वनडे मालिका असल्याने आम्हाला ३ मिलियन अमेरिकी डॉलरच्या जवळपास कमाईची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त आम्हाला अपेक्षा आहे की, सर्व सामन्यांमध्ये मैदान दर्शकांनी भरलेले असेल. या हिशोबाने हा दौरा आमच्यासाठी फायदेशीर राहिल.”

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

आताची लहान पोरंही फाडफाड इंग्लिश बोलतात! तोडक्यामोडक्या इंग्रजीमुळे आझमचं होतंय हसू, तुम्हीही पाहा

भारतीय चाहत्याचा नादच नाय! विराटला ट्रोल करायला निघालेल्या ‘बार्मी आर्मी’ची केली बोलतीच बंद

संगत का असर! पुजाराच्या साथीदाराचे द्विशतक, ११ षटकार आणि १८ चौकारांसह केली मॅरेथॉन खेळी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---