भारतीय पुरूष क्रिकेट संघ झिम्बाब्वेच्या (ZIMvsIND) दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना गुरूवारी (१८ ऑगस्ट) हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे खेळला जाणार आहे. याआधी भारतीय संघातील खेळाडूंनी कसून सराव केला. त्यांना सराव करताना काही चाहते ग्राउंडच्या बाहेर गोळा झाले. हरारे येथे मोठ्या प्रमाणात भारतीय राहतात. त्या चाहत्यांमधील काही पटना, हिमाचल प्रदेश तर काही मुंबईतील होते. यावेळी एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले आहेत.
भारताचा फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) हा सराव करत असताना गेटच्या बाहेरील चाहते ‘इशान-इशान’ अशा हाका मारत होते. त्यातील एकाने ओरडत म्हटले, ‘इशान भाई पटना…, पटना’ यावर इशानने त्याला उत्तर देत म्हटले, “बरोबर आहे पाजी. मी पण पटनाचाच आहे.” तर आणखी एका चाहत्याने म्हटले, “मी तुमचा मित्र यशस्वीला ओळखतो.” त्यावर इशानने त्याला प्रश्न केला, “मग इथे काय करत आहात?” यावर त्या चाहत्याने उत्तर देत म्हटले, “मी इथे काम करतो.” या संभाषणानंतर इशान गेटच्या बाहेर उभ्या असलेल्या चाहत्याकडे गेला आणि त्याने फोटो काढला. यावेळी त्याने अजून बऱ्याच भारतीय चाहत्यांसोबत सेल्फीही काढला.
इशानसोबत फोटो काढून भारतीय चाहत्यांनी नेटमध्ये सराव करणाऱ्या अक्षर पटेल याच्यासोबतही सेल्फी काढले.
भारत या दौऱ्यात केएल राहुल (KL Rahul) याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि रिषभ पंत यांना वगळले आहे. एशिया कप ऑगस्ट महिन्याच्या शेवटी होणार असल्याने त्याच्या सरावासाठी वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती दिली गेली आहे. तर नुकतेच वॉशिंगटन सुंदर दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्याच्याजागी शाहबाज अहमद याची निवड करण्यात आली.
This video makes me extremely happy.. Thanks a lot @Vimalwa ji for uploading on your youtube channel..
Here the superstar of Patna @ishankishan51 meets his fans from Patna in Zimbabwe..
Subscribe to @Vimalwa sir youtube channel for more.. Full video : https://t.co/uucDEBbOu6 pic.twitter.com/ugCMYaHzna
— Anurag Sinha (@anuragsinha1992) August 16, 2022
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ-
भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अनुभवी संघांना पछाडत नवख्या जर्सीने मारली बाजी! वर्ल्डकप क्वालिफायर्सचे तिकीट केले बुक
एशिया कप। ‘या’ विक्रमामध्ये भारताच्याच खेळाडूंचा बोलबाला! माजी कर्णधार तर अव्वल स्थानावर
सचिनला ओळखत नव्हतो म्हणणाऱ्या अख्तरला आकडेच पाडतायेत तोंडघशी