कोलोन येथे इनडोअर टेनिस स्पर्धेत रविवारी (18 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात अव्वल मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हने कॅनडाच्या फेलिक्स आगुर आलीसामीला पराभूत केले. एक तास 20 मिनिटे चाललेल्या या सामन्यात जर्मनीच्या झ्वेरेव्हने 6-3, 6-3 ने शानदार विजय मिळविला.
झेवरेव्हने यंदा चमकदार कामगिरी बजावली आहे, पण त्याला एकही विजेतेपद मिळवता आले नव्हते. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत तसेच यूएस ओपनच्या अंतिम सामन्यातही प्रवेश केला होता. पण त्याला विजेतेपद मिळवता आले नव्हते. गेल्या 17 महिन्यांतील हे त्याचे पहिले विजेतेपद आहे.
जिंकल्यानंतर झ्वेरेव्ह म्हणाला की, न्यूयॉर्कमधील यूएस ओपनचा अंतिम सामना माझ्यासाठी खूप कठीण होता आणि त्यानंतर हा माझा दुसरा अंतिम सामना होता. मला या सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करायची होती.
“फेलिक्स एक अविश्वसनीय खेळाडू आहे. मला खात्री आहे की तो फक्त एकच विजेतेपद जिंकणार नाही तर, अनेक विजेतेपद जिंकणार आहे, यापेक्षाही मोठे विजेतेपद तो जिंकेल. आम्ही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. तो लवकरच किताबाचा मानकरी होईल याचा मला विश्वास आहे.” असेही पुढे बोलताना झ्वेरेव्ह म्हणाला.
"I'm sure he's going to win not only one, but many titles in his career."@bett1hulks champ @AlexZverev on getting to know @felixtennis during the recent pandemic 👊 pic.twitter.com/CKWY3PrjtK
— ATP Tour (@atptour) October 18, 2020
झ्वेरेव्हने जर्मनीसाठी तीन स्पर्धात्मक ट्रॉफी जिंकल्या आहेत आणि तो आपल्या देशात काही काळ अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू होता.
महत्त्वाच्या बातम्या –
St. Petersbug Open : रियल ओपाल्कने गतविजेत्या मेदवेदेवला दिला पराभवाचा धक्का
Australia Open : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला क्वारंटाईन नियमांमध्ये हवी सूट
कोलोन टेनिस स्पर्धा: अँडी मरे पहिल्याच फेरीत पराभूत