लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 35.2 षटकात 107 धावांवर संपुष्टात आला आहे. या सामन्यात इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने 5 विकेट्स घेतल्या.
या सामन्याचा पहिला दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (10 आॅगस्ट) सामन्याला सुरुवात झाली. परंतू दुसऱ्या दिवशीही पावसाचा सातत्याने व्यत्यय येत होता.
याबरोबर अॅंडरसनने लाॅर्ड्सवर एक असा पराक्रम केला आहे ज्याचा विचारही अनेक गोलंदाज कधी करत नाही.
काल जेव्हा अॅंडरसनने इशांत शर्माला बाद केले तेव्हा त्याचा हा लाॅर्ड्सवरील ९९वा बळी ठरला. एकाच मैदानावर ९९ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा तो केवळ तिसरा गोलंदाज ठरला.
यापुर्वी मुथय्या मुरलीधरनने हा पराक्रम तीन मैदानांवर तर रंगाना हेराथने एका मैदानावर केला आहे.
लाॅर्ड्यवर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावार स्टुअर्ट ब्राॅड असून त्याने २१ सामन्यात ७९ तर इयान बाॅथमने १५ सामन्यात ६९ विकेट्स घेतल्या आहेत.
एकाच मैदानावर सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-
१६६- मुथय्या मुरलीधरन, कोलंबो
११७- मुथय्या मुरलीधरन,कॅंडी
१११- मुथय्या मुरलीधरन, गाॅल
९९- रंगाना हेराथ, गाॅल
९९- जेम्स अॅंडरसन, लाॅर्ड्स
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–अर्जून तेंडुलकर करतोय लॉर्ड्सच्या ग्राउंडस्टाफला मदत, चाहत्यांनी केले जोरदार कौतूक
–जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी
–लॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते