पुणे, 21 सप्टेंबर 2023: थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंटस एलएलपी यांच्या वतीने आयोजित पहिल्या थर्ड आय 14 वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, पीवायसी हिंदु जिमखाना या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
सनराईज क्रिकेट स्कुल व सहारा क्रिकेट अकादमी येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत ओम पाटील नाबाद 101धावा)याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने राहुल क्रिकेट अकादमी संघाचा 3 धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 45 षटकात 1बाद 207धावा केल्या. यात ओम पाटीलने 130चेंडूत 14चौकाराच्या मदतीनेंनाबाद 101 धावांची खेळी केली. त्याला तरुण श्रीकृष्णनने नाबाद 57 धावा काढून साथ दिली. याच्या उत्तराt राहुल क्रिकेट अकादमी संघ 41.3 षटकांत सर्वबाद 204धावाच करू शकला. यात प्रतिक कडलक 66 सार्थक धर्माधिकारी 45, विहान केंजळे 39यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. व्हेरॉककडून आरुष पासलकर(3-36), अर्णव मधुगिरी(2-36), फरहान मुल्ला(1-17) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
दुसऱ्या सामन्यात ओंकार साळुंखेने केलेल्या 83धावांच्या खेळीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने सहारा क्रिकेट अकादमी संघाचा 60धावांनी पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली. याआधी स्पर्धेचे उद्घाटन माजी महाराष्ट्राचे कर्णधार सुरेंद्र भावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक अभिषेक अग्रवालz सहारा क्रिकेट अकादमी व महाराष्ट्र रणजीपटू अवधूत दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
सनराईज स्कूल मैदान: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 45 षटकात 1बाद 207धावा(ओम पाटील नाबाद 101(130,14×4), तरुण श्रीकृष्णन नाबाद 57(85,6×4), श्रावण राठोड 17) वि.वि.राहुल क्रिकेट अकादमी : 41.3 षटकांत सर्वबाद 204धावा(प्रतिक कडलक 66(79,10×4), सार्थक धर्माधिकारी 45(51,8×4), विहान केंजळे 39(44,5×4,1×6), आरुष पासलकर 3-36, अर्णव मधुगिरी 2-36, फरहान मुल्ला 1-17); सामनावीर – ओम पाटील; व्हेरॉक संघ 3 धावांनी विजयी;
सहारा क्रिकेट मैदान: पीवायसी हिंदू जिमखाना: 35 षटकात 9बाद 204धावा(ओंकार साळुंखे 83(83,14×4), ईशान गुप्ते 32(44,2×4,1×6), जयंत वडघुले 18, वरद प्रधान 2-32, आदित्य तुळजापूरकर 1-19) वि.वि.सहारा क्रिकेट अकादमी: 33 षटकात सर्वबाद 144धावा(शंकर ढवळे 64(73,7×4,3×6), इशान शेळके 24, ओजस शेंद्रे 13, अमेय देशपांडे 2-19, असीम देवगावकर 2 -37); सामनावीर – ओंकार साळुंखे; पीवायसी संघ 60 धावांनी विजयी.
महत्वाच्या बातम्या –
पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धेत डेक्कन जिमखाना संघाला विजेतेपद
सुनील छेत्रीने जिंकलं 140 कोटी भारतीयांचं मन, Asian Games 2023मध्ये संघाला मिळवून दिला पहिला विजय