क्रिकेटविश्वात असे अनेक क्रिकेटपटू होऊन गेले आहेत, जे कित्येक त्याग आणि बलिदान देऊन आपल्या देशाच्या क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्त्व करतात. यामागे त्यांचे अथक परिश्रम आणि त्यांच्या कुटुंबाचे समर्थन असते. तसं तर, कोणत्याही क्रिकेटपटूसाठी त्याचे कुटुंब खूप महत्त्वाचे असते. कारण, कुटुंबातील काही व्यक्तींच्या पाठींब्यामुळे तर अनेकांना आपले ध्येय गाठण्याची शक्ती मिळते. कुटुंबातील मंडळी सुख असो वा दु:ख नेहमी खेळाडूच्या सोबत असतात.
पण, प्रत्येक खेळाडूला आपल्या देशाच्या क्रिकेट संघाकडून खेळण्यासाठी आपल्या कुटुंबापासून दूर रहावे लागते. कारण, कोणताही खेळाडू प्रत्येक ठिकाणी आपल्या कुटुंबाला घेऊन जाऊ शकत नाही. या कारणामुळेच काही खेळाडूंना आपल्या कुंटुबाच्या सुख-दुखा:त सहभागी होता येत नाही.
या लेखात अशाच काही क्रिकेटपटूंचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांनी क्रिकेटसाठी आपल्या कुटुंबातील सुख-दुखा:च्या क्षणांनाही बाजूला ठेवले. (10 Cricketers Who Gave Time To Cricket Before Family)
सचिन तेंडूलकर –
क्रिकेट जगतातील महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने भारताकडून २४ वर्षे क्रिकट खेळले आहे. दरम्यान तो बराच काळ आपल्या कुंटुंबापासून दूर राहिला आहे. १९९९ साली विश्वचषकादरम्यान सचिनचे वडील रमेश तेंडूलकर यांचे निधन झाले होते. त्यावेळी सचिन हा इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळत होता. वडीलांचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर लगेचच इंग्लंडला परतत सचिनने केनियाविरुद्ध सामना खेळला होता. मनात वडीलांच्या निधनाचे दुख: असतानाही त्याने क्रिकेटमध्ये शतकी खेळी केली होती.
विराट कोहली –
भारताचा कर्णधार विराट कोहलीला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. परंतु, विराटने इथपर्यंतचा प्रवास उगाच गाठलेला नाही. यासाठी त्याने मेहनत तर केली आहे. पण सोबतच त्याने अनेक त्यागही केले आहेत. २००८ साली दिल्ली येथे रणजी सामना चालू होता. दरम्यान विराटला आपले वडील वारल्याचे बातमी कळाली. यामुळे विराट थोड्या वेळासाठी गडबडला. पण त्याने स्वत:ला सावरले आणि त्या सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला. विराटच्या ९० धावांच्या खेळीने दिल्ली संघाला हारता सामना जिंकून दिला आणि दिवसाचा डाव संपताच तो आपल्या वडीलांच्या अंतिम विधीमध्ये पोहोचला.
एमएस धोनी –
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या संघर्षाची कहानी सर्वांना माहित आहे. धोनीने भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतले होते. त्याने भारतीय क्रिकेटसाठी खूप योगदान दिले आहे. ६ फेब्रुवारी २०१५ला धोनी पहिल्यांदा वडील बनला होता. त्यावेळी तो ऑस्ट्रेलियामध्ये २०१५ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघाबरोबर होता. त्यामुळे तो त्याच्या नवजात मुलीला पहायला गेला नव्हता तसेच त्यावेळी तो आपल्या पत्नीला वेळ देऊ शकला नव्हता. त्याने आपल्या मुलीला पहिल्यांदा जवळजवळ तिच्या जन्माच्या दोन महिन्यांनंतर पाहिले होत.
ब्रेंडन टेलर –
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज ब्रेडन टेलर हा संघातील दमदार फलंदाज आहे. २००४ साली त्याने श्रीलंकाविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. इंडियन प्रीमियर लीगच्या सनराइजर्स संघात निवड झाल्यानंतर ब्रेंडनने आपल्या पत्नीसोबत हनिमुनला जाण्याचे रद्द केले होते. असे असले तरी, त्याला आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
ब्रेट ली –
ब्रेट ली हा ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज होता. आपल्या वेगवान गोलंदाजीने त्याने क्रिकेट क्षेत्रात वेगळी छाप पाडली होती. ब्रेट लीनेही क्रिकेटसाठी आपल्या कुटुंबातील सर्वात आनंदाच्या क्षणाला गैरहजेरी लावली होती. २००६ साली तो वडील झाला होता. परंतु, त्यावेळी तो ऍशेज सीरीजसाठी आपल्या संघासोबत होता. तो आपल्या पत्नीला त्यावेळी वेळ देऊ शकला नाही.
पार्थिव पटेल –
यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्याने २०१८मध्ये भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. पार्थिवसोबतही एकदा अशी घटना घडली आहे, जेव्हा त्याने आपल्या कुटुंबापेक्षा क्रिकेटला जास्त प्राधान्य दिले. २०१९ सालच्या आयपीएल हंगामादरम्यान पार्थिवचे वडील आजारी पडले होते, तसेच हॉस्पिटलमध्ये होते. तरीही, पार्थिव आयपीएल खेळत होता.
जेसन रॉय –
इंग्लंड क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉय याने गेल्या काही वर्षात आपल्या संघासाठी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. तो सध्या इंग्लंड संघाचा प्रमुख खेळाडू बनला आहे. २०१८ साली इंग्लंड संघ पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिका खेळत होता. त्या वनडे मालिकेतील चौथ्या सामन्यापुर्वी रॉयची मुलगी आजारी होती. तो रात्रभर त्याच्या मुलीसोबत दवाखान्यात थांबला होता आणि दूसऱ्या दिवशी सकाळी सामना खेळण्यासाठी पोहोचला होता.
राशिद खान –
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा फिरकीपटू राशिद खानच्या उत्तम प्रदर्शनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तो क्रिकेटसाठी आपल्या कुटुंबातील सर्वात दु:खदायी क्षणाच्यावेळी उपस्थित राहू शकला नव्हता. २०१९मध्ये तो बिग बॅश लीग खेळत होता. दरम्यान त्याच्या वडीलांचा मृत्यू झाला होता. त्याला हे वृत्त मिळाल्यानंतरही त्याने क्रिकेट खेळण्याला प्राधान्य दिले.
मोहम्मद शमी –
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोदम्मद शमी गेल्या काही वर्षांपासून शानदार प्रदर्शन करत आहे. तो सध्या भारतीय संघातील उपयुक्त गोलंदाज बनला होता. त्याने क्रिकेटसाठी आपल्या आजारी असणाऱ्या मुलीकडे दुर्लक्षित केले होते. २०१६ साली भारत न्यूझीलंडविरुद्ध मालिका चालू होती. दरम्यान शमीची मुलगी खूप आजारी पडली होती. ती खूप गंभीर अवस्थेत होती. त्यामुळे तिला आयसीयुमध्ये भर्ती करण्यात आले होते. परंतु, शमी भारतीय संघाचा भाग असल्यामुळे आपल्या मुलीला बघण्यासाठी गेला नव्हता.
आर अश्विन –
आर अश्विन हा भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फिरकीपटू गोलंदाज आहे. त्याने जवळपास १० वर्षे भारतीय संघासाठी योगदान दिले आहे. क्रिकेटसाठी अश्विनने खूप मोठा त्याग देत सर्वांसमोर एक उदाहरण मांडले. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या एका मालिकेदरम्यान चेन्नई येथे भयानक पूर आला होता. त्यामध्ये अश्विनचे आई-वडीलही अडकले होते. २४ तास अश्विन त्यांच्याशी संपर्क साधू शकला नव्हता. अशा कठीण परिस्थितीतही त्याने क्रिकेटला प्राधान्य दिले होते.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: असे ३ परदेशी खेळाडू, ज्यांचा फॉर्म ठरेल त्यांच्या संघासाठी सर्वाधिक फायद्याचा
एका वर्षात ३०० पेक्षा अधिक चौकार मारणारा ‘हा’ आहे एकमेव भारतीय
बीसीसीआयने कसली कंबर, आयपीएल २०२० बाबत घेतले ‘हे’ मोठे ५ निर्णय
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडला विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी आयपीएलची झाली अशी मदत, मॉर्गनने केला खुलासा
आपल्या देशासाठी जखम झालेलं स्वत:चं बोट कापायलाही तयार झालेला क्रिकेटर
भारतीय माजी क्रिकेटपटू झाला कोच, थेट कॅरेबियन लीगमध्ये करणार मार्गदर्शन