क्रिकेटमध्ये आजपर्यंत अनेक दिग्गज फलंदाज झाले आहेत, ज्यांनी मोठमोठे विक्रम रचले. मग कसोटी क्रिकेट असो, वनडे असो किंवा टी२० प्रत्येक क्रिकेट प्रकारात शानदार कामगिरी करणारे अनेक फलंदाज आजपर्यंत पहायला मिळाले आहेत. खेळपट्टीवर टिकून चांगली कामगिरी करत विरुद्ध संघातील गोलंदाजांचा समाचार घेत अधिकाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांकडे सन्मानाने पाहिले जाते. पण आजपर्यंत असेही काही क्रिकेटपटू पहायला मिळाले ज्यांना त्यांच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाते. असाच एक भारतीय क्रिकेटपटू म्हणजे विरेंद्र सेहवाग.
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने आक्रमक खेळताना अनेकदा मोठ्या खेळी केल्या. एवढेच नाही तर त्याने कसोटीत २ त्रिशतके, वनडेत द्विशतकही केले आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. यातीलच एक विक्रम म्हणजे एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० पेक्षा अधिक चौकार मारणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू होण्याचा.
सेहवागने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३३ सामने खेळताना ५२.३३ च्या सरासरीने २३५५ धावा केल्या होत्या. या वेळी त्याने ४४ षटकार तर तब्बल ३०२ चौकार मारले होते. ३०२ चौकारांमुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक चौकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला होता. आजही त्याचा हा विक्रम अबाधित आहे. आजही त्याच्याव्यतिरिक्त एकाही भारतीय क्रिकेटपटूला एका वर्षात ३०० पेक्षा अधिक षटकार मारता आलेले नाहीत.
२००८ याचवर्षी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नई कसोटीच ३१९ धावांची खेळी केली होती आणि तो भारताकडून कसोटीत दोन त्रिशतके करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला होता.
सेहवाग हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक चौकार मारणाऱ्या जगातील एकूण क्रिकेटपटूंमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्यासह आत्तापर्यंत केवळ ५ क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात ३०० किंवा त्यापेक्षा अधिक चौकार मारता आले आहेत. एका वर्षात सर्वाधिक चौकार मारण्याचा विश्वविक्रम सध्या तिलत्करने दिल्शानच्या नावावर असून त्याने २००९ ला ३१८ चौकार मारले होते.
तसेच दिल्शान आणि सेहवाग व्यतिरिक्त केन विलियम्सन, कुमार संगकारा आणि रिकी पाँटिंग यांनाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात ३०० किंवा त्यापेक्षा अधिक चौकार मारता आले आहे. विशेष म्हणजे संगकाराने असा पराक्रम २ वेळा केला आहे. त्याने २००६ आणि २०१४ या दोन वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० पेक्षा अधिक चौकार मारले आहे. २ वेळा एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० किंवा त्यापेक्षा अधिक चौकार मारणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक चौकार मारणारे क्रिकेटपटू –
३१८ चौकार – तिलत्करने दिल्शान (२००९)
३०९ चौकार – केन विलियम्सन (२०१५)
३०७ चौकार – कुमार संगकारा (२००६)
३०२ चौकार – विरेंद्र सेहवाग (२००८)
३०१ चौकार – कुमार संगकारा (२०१४)
३०० चौकार – रिकी पाँटिंग (२००५)
आयपीएलच्या सर्व संघातील डेथ ओव्हर स्पेशलिस्ट, जे १३व्या हंगामात करु शकतात कमाल
एमएस धोनीच्या सीएसके संघातील ३ फ्लॉप खेळाडू, ज्यांच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होतं मोठ नाव
महत्त्वाच्या बातम्या –
एका हाताला दोन बोटे नसतानाही क्रिकेटमध्ये स्वत:ची वेगळी छाप टाकणारा गोलंदाज
भारताचा हा ‘दिग्गज’ म्हणतो, स्टुअर्ट ब्रॉडच्या पायांमध्ये आहे स्प्रिंग
…आणि इथेच वेस्ट इंडिजची टीम चूकली, या दिग्गजाने सांगितले वेस्ट इंडिजच्या पराभवाचे कारण