आयपीएल २०२२(IPL 2022) चा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला पार पडणार आहे. या लिलावासाठी ५९० खेळाडूंची यादी जाहीर केली आहे आणि आता या खेळाडूंवर फ्रॅंचायझी बोली लावणार आहेत. आयपीएल लिलावात दिग्गज खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी ठेवण्यात आली आहे. बीसीसीआयकडून या ब्रॅकेटमध्ये जास्तीत जास्त ४८ खेळाडू ठेवण्यात आले आहेत. १.५ कोटी मूळ किंमत असलेल्या २० खेळाडूंचा समावेश यादीत आहे. तसेच १ कोटी मूळ किंमत असलेल्या लिलावात ३४ खेळाडू सहभागी होणार आहेत. या लेखात आपण अशा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्या १० मार्की खेळाडूवर पैशांचा पाऊस पडू शकतो. आयपीएलने सोशल मीडियावर या १० मार्की खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
१) शिखर धवन
गेल्या मोसमत दिल्ली कपिटल्सकडून खेळत शानदार कामगिरी करणाऱ्या शिखर धवनवर लिलावात सर्वांचेच लक्ष आहे. धवनला मार्की खेळाडू म्हणून लिलावात ठेवण्यात आले आहे. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. या लिलावात फ्रँचायझी धवनला खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम लावू शकतात. दिल्ली कॅपिटल्स संघ धवनला रिटेन करू शकतो. धवनने आयपीएलमध्ये आतापर्यंत १९२ सामन्यांमध्ये ५७८४ धावा केल्या आहेत. त्यामध्ये २ शतकांचा समावेश आहे.
२) श्रेयस अय्यर
श्रेयस अय्यरचा ही आयपीएल लिलावात मार्की खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. श्रेयस अय्यरही या लिलावात मालामाल होण्याची शक्यता आहे. श्रेयसला दिल्ली कॅपिटल्स संघाने रिटेन केले आहे. केकेआर, आरसीबी आणि पंजाब किंग्जला या मोसमात नवीन कर्णधाराची गरज आहे. तिन्ही संघांची नजर श्रेयस अय्यरवर असणार आहे. अय्यरने ८७ आयपीएल सामन्यांमध्ये २३७५ धावा केल्या असून, १६ अर्धशतके सुद्धा लगावली आहेत.
३) मोहम्मद शमी
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने गेल्या काही वर्षांत चमकदार कामगिरी केली आहे. आयपीएल लिलावाच्या मार्की खेळाडूमध्ये त्यचाही समावेश करण्यात आला आहे. फ्रँचायझी शमीबाबत लिलावादरम्यान मोठी रक्कम खर्च करण्यासही तयार असेल. शमीला डेथ ओव्हर्समध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे. अशा स्थितीत फ्रँचायझी शमीवरही लिलावात पैसे खर्च करण्यास तयार असतील.
४) रविचंद्रन अश्विन
आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार राहिलेल्या रविचंद्रन अश्विनवरही सर्वांच्या नजरा असतील. भारतात अश्विनची गोलंदाजी कोणत्याही फलंदाजाला अडचणीत आणू शकते. अश्विन देखील कर्णधार होऊ शकतो. याचाच अर्थ की फ्रँचायझी त्याच्याकडे कर्णधार म्हणून पाहू शकतात. अश्विनने आयपीएलमध्ये आतापर्यंत शानदार गोलदाजी करत एकूण १४५ विकेट घेतल्या आहेत.
५) पॅट कमिन्स
कोलकाता नाईट रायडर्सकडून मागील हंगामात खेळलेल्या पॅट कमिन्सचा सुद्धा मार्की खेळाडू म्हणून आयपीएल लिलावात समावेश करण्यात आला आहे. कमिन्स गोलंदाज म्हणून खूप यशस्वी ठरला आहे आणि फ्रँचायझी त्याला आपल्या संघात समाविष्ट करण्याचा स्पर्धा करू शकतात.
६) डेव्हिड वॉर्नर
या लिलावात हैद्राबादच्या कर्णधारावर सर्वांच्या नजरा असण्याची शक्यता आहे. वॉर्नरला मागच्या हंगामामध्ये अनेक समस्यांना समोर जावे लागले होते. आयपीएल लिलावात, वॉर्नरला विकत घेण्यासाठी फ्रँचायझी आपापसात स्पर्धा करू शकतात. वॉर्नरने आतापर्यंत आयपीएलमध्ये १५० सामने खेळले असून ५४४९ धावा केल्या आहेत.
७) फाफ डु प्लेसिस
फाफ डु प्लेसिस हा देखील मार्की खेळाडू म्हणून आयपीएल लिलावात उतरणार आहे. डु प्लेसिसला चेन्नईने कायम ठेवलेले नाही पण या खेळाडूला चेन्नई रिटेन करू शकते. आयपीएलमध्ये डुप्लेसिसने उत्कृष्ट कामगिर केली आहे.
८) क्विंटन डी कॉक
मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या क्विंटन डी कॉकवर सुद्धा जास्त पैसे लागण्याची शक्यता आहे. क्विंटन डी कॉकलाही आयपीएल लिलावात मार्की खेळाडू समाविष्ट करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स डी कॉकला पुन्हा संघात घेऊ शकतो. डी कॉकची मूळ किंमतही 2 कोटी रुपये आहे.
९) कागिसो रबाडा
दिल्ली कॅपिटल्ससाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या कागिसो रबाडावरही फ्रेंचायझी लिलावादरम्यान लक्ष केंद्रित करतील. रबाडाला दिल्ली कॅपिटल्सने कायम ठेवलेले नाही. आयपीएल लिलावातील मार्की खेळाडूंच्या यादीत रबाडाला ही समाविष्ट करण्यात आले आहे. रबाडा कोणत्या संघाकडून खेळेल याकडे सर्वांचे लक्षा लागले आहे.
१०) ट्रेंट बोल्ट
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेट बोल्टचाही मार्की खेळाडूमध्ये समावेश करण्यात आला आहे. बोल्टला मुंबई इंडियन्सने सांघात ठेवले नाही. या लिलावात बोल्टवर पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
सुपर से भी ऊपर! दक्षिण आफ्रिकी खेळाडूने हवेत टिपला भारी झेल; आयसीसीही म्हणे, ‘सर्वोत्तम झेल’