हॅमिल्टन। आज(29 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा टी20 सामना सेडन पार्क येथे पार पडला आहे. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात भारताने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. हा सामना निर्धारित 20-20 षटकानंतर बरोबरीत संपल्याने सुपर ओव्हर घेण्यात आली होती.
सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 17 धावा करत भारताला 18 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुलने मिळून पहिल्या 4 चेंडूत 8 धावा केल्या होत्या.
त्यामुळे भारताला विजयासाठी शेवटच्या 2 चेंडूत 10 धावांची गरज होती. यावेळी फलंदाजी करत असलेल्या रोहित शर्माने दोन्ही चेंडूवर षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला.
मात्र असे असले तरी रोहितने आज सुपर ओव्हरमध्ये केलेल्या 15 धावा, तसेच त्याने मारलेल्या 2 षटकारांचा समावेश त्याच्या कारकिर्दीतील कामगिरीत होणार नाही. कारण सुपर ओव्हरमधील एखाद्या खेळाडूची कामगिरी त्याच्या कारकिर्दीतील कामगिरीमध्ये ग्राह्य धरली जात नाही.
10 runs needed off last 2 balls and Rohit hits two sixes to seal the match and series for India.
What a pity that Super Over performances don't count in players' career records!#NZvIND
— Rajneesh Gupta (@rgcricket) January 29, 2020
रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 362 सामन्यात 417 षटकार मारले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत ख्रिस गेल(534) आणि शाहिद आफ्रिदी(476) नंतर तो तिसऱ्या स्थानावर आहे.
I think Rohit Sharma will finish his career with 998 sixes leaving people arguing why the two sixes in Hamilton were not counted in his career stats ???? #NZvInd
— Mazher Arshad (@MazherArshad) January 29, 2020
भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय; अशी रंगली सुपर ओव्हर
वाचा????https://t.co/vyCccVvia9????#म #मराठी #Cricket #NZvIND #TeamIndia #SuperOver— Maha Sports (@Maha_Sports) January 29, 2020
अखेर कर्णधार कोहली ठरला नंबर वन; 'कॅप्टनकूल' धोनीचा विक्रम मोडलाच!!
वाचा????https://t.co/7KSn1Is8im????#म #मराठी #Cricket #NZvIND #TeamIndia @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 29, 2020






