अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील अखेरचे २ सामने आणि ५ टी२० सामन्यांची मालिका ही मोटेरा स्टेडियमवर होणार आहे. मोटेरा स्टेडियमला सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियम असे नाव देण्यात आले आहे. हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे.
या स्टेडियमचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २४ फेब्रुवारीलाच पार पडणार आहे. मोटेरा स्टेडियम हे पुर्नबांधणी केलेले स्टेडियम असून आता ते जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून ओळखले जाते. त्यामुळे भारत आणि इंग्लंड संघात होणारा तिसरा कसोटी सामना हा पुर्नबांधणी केलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणारा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. त्यानंतर ४ मार्चपासून या स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघात चौथा कसोटी सामना होईल. तसेच १२ ते २० मार्चदरम्यान ५ टी२० सामने पार पडतील.
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असणाऱ्या मोटेरा स्टेडियमची काही वैशिष्ट्ये –
-या स्टेडियमला सरदार वल्लभभाई पटेलांचे नाव दिले आहे. या स्टेडियमला मोटेरा स्टेडियम असेही म्हटले जाते. या स्टेडियमवर १९८४ला पहिला वनडे सामना झाला होता. तसेच इथे १२ कसोटी, २३ वनडे आणि १ आंतरराष्ट्रीय टी२० सामना झाला आहे. पण २०१५ पासून जून्या मोटेरा स्टेडियमची पुर्नबांधणी करण्यास सुरुवात करण्यात आली. मागीलवर्षी हे स्टेडियम पूर्ण पणे तयार झाले आणि आता हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ठरले आहे.
-हे नवीन मोटेरा स्टेडियम जवळजवळ ६३ एकर जागेत बनले आहे. तसेच या स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत.
-या स्टेडियमची आसनक्षमता १ लाख १० हजार एवढी आहे.
Let there be light #MoteraStadium
Ahmedabad, India 🇮🇳 pic.twitter.com/hCfZ9V5CoW— BCCI (@BCCI) February 21, 2020
-या नवीन स्टेडियममध्ये ७६ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. यातील प्रत्येक बॉक्समध्ये २५ जणांची आसन क्षमता आहे.
-या स्टेडियममध्ये ५५ खोल्या असलेले क्लब हाऊसदेखील आहे. तसेच त्यात एक जीम आणि ऑलिंपिक साईज स्विमिंग पूल देखील आहे.
– तसेच या स्टेडियममध्ये ३ प्रॅक्टीस ग्राउंड, १ इनडोअर क्रिकेट ऍकेडमीचीही सुविधा आहे.
Some hard yards for our quicks in Ahmedabad 🥵 pic.twitter.com/71l8ZB76j1
— England Cricket (@englandcricket) February 19, 2021
-हे स्टेडियम बांधण्यासाठी अंदाजे ७०० कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.
-स्टेडियम बनवणाऱ्या कंपनीने (L&T) असा दावा केला आहे की स्टेडियममध्ये अशा एलईडी दिवे लावण्यात आले आहेत की ज्यामुळी खेळाडूंची सावलीही कमी पडेल.
-त्याचबरोबर या स्टेडियमची पार्किंग सुविधाही चांगली असून. एकावेळी येथे ३००० कार आणि १० हजार दुचाकी वहाने पार्क केली जाऊ शकतात.
First pink-ball Test at Motera 👌
State-of-the-art facilities 👏As the world's largest cricket stadium gears up to host the @Paytm #INDvENG pink-ball Test, excitement levels are high in the #TeamIndia camp 😎🙌 – by @RajalArora
Watch the full video 🎥👇https://t.co/Oii72qDeJK pic.twitter.com/NqhEa7k7mm
— BCCI (@BCCI) February 20, 2021
-या स्टेडियमच्या जून्या मैदानात काही खास विक्रम भारतीय खेळाडूंनी केले आहे. त्यातील उल्लेखनीय म्हणजे सुनील गावसकरांना १० हजार कसोटी धावांचा टप्पा याच मैदानात पार केला होता. तर कपिल देव यांनी रिचर्ड हेडली यांना मागे टाकत कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम याच मैदानात खेळताना केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, पाहा संपूर्ण यादी