---Advertisement---

वनडेत १० हजार धावा करणारा एमएस धोनी चौथा भारतीय

On: शनिवार, जुलै 14, 2018 10:48 PM
---Advertisement---

लाॅर्ड्स । भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने वनडे कारकिर्दीत १० हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या वनडेत त्याने हा पराक्रम केला. या सामन्यापुर्वी १० हजार धावा करण्यासाठी धोनीला ३३ धावांची गरज होती.

भारतीय खेळाडूंपैकी वनडे सामन्यात १० हजार धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर(18426), सौरव गांगुली(11363) आणि राहुल द्रविड(10889) या दिग्गजांचा समावेश आहे.

या १० हजार धावांबरोबर वनडेत अशी कामगिरी करणारा धोनी जगातील १२वा खेळाडू ठरला आहे.

३६ वर्षीय धोनी आज लाॅर्ड्सवर कारकिर्दीतील ३२०वा सामना खेळत आहे.

धोनीने वनडे कारकिर्दीत १० शतके आणि ६७ अर्धशतके केली असून नाबाद १८३ हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.

या खेळाडूंनी केल्या आहेत वनडे कारकिर्दीत १० हजार धावा

1. सचिन तेंडुलकर – 18,426 runs (463 सामने)

2. कुमार संगकारा – 14,234 (404)

3. रिकी पॉन्टिंग – 13,704 (375)

4. सनथ जयसूर्या – 13,430 (445)

5. माहेला जयवर्धने- 12,650 (448)

6. इंझमाम उल हक- 11,739 (378)

7. जॅक कॅलिस – 11,579 (328)

8. सौरव गांगुली – 11,363 (311)

9. राहुल द्रविड- 10,889 (344)

10. ब्रायन लारा- 10,405 (299)

11. तिलकरत्ने दिलशान- 10,290 (330)

12. एमएस धोनी- 10,000 (320)

महत्त्वाच्या बातम्या:

-Video: भारत-इंग्लंड चालू सामन्यातच त्याने प्रेयसीला घातली लग्नाची मागणी

-कुलदीप यादव कारकिर्दीतील अफलातून फाॅर्ममध्ये, आजही केला खास कारनामा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment